Type to search

maharashtra जळगाव

तापमानाचा पारा 42.2 अंशावर

Share
जळगाव । शहरासह जिल्ह्याच्या तापमानात पुन्हा वाढ झाली असून पारा 42.2 अंशावर पोहचला आहे. त्यामुळे दुपारच्यावेळी नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी शहरातील प्रमुख रस्ते निर्मनुष्य असल्याचे दिसून येत आहे. तसेच मार्केटमध्ये देखील दुपारच्यावेळी शुकशुकाट दिसून येत होता.

गेल्या काही दिवसांपूर्वी फॅनी वादाळाच्या प्रभावामुळे तापमानात घट झाली होती. तापमानाचा पार अचानक 7-8 अंशांनी खाली घसरला होता. त्यामुळे काहीप्रमाणात जळगावकरांना दिलासा मिळाला होता. परंतू गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुन्हा तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे जळगावकरांना चांगलाच उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. सकाळपासान उन्हाचे चटके जाणवू लागत असल्याने नागरिक चांगलेच घामाघुम झाले आहे. दरम्यान येत्या दोन दिवसात तापमानामध्ये वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. वाढत्या तापमानाचा लहान मुलांना व वृध्दांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

वैशाख वणवा पेटला
दरवर्षी वैशाख महिन्यात तापमानाचा पारा सर्वाधिक असतो. या वर्षी देखील सूर्य आग ओकू लागल्याने वैशाख वणवा पेटल्याचे बोलले जात आहे.

शेवटच्या आठवड्यात होणार तापमानात घट
यंदा एप्रिल महिन्यात तापमानाने उच्चांक गाठला होता. एप्रिल महिन्याच्या एंडलाच तापमान जवळपास 45 अंशापर्यंत पोहचले होते. त्यानंतर फॅनी वादळामुळे तापमानात घट झाली होती. परंतू आता पुन्हा तापमानात वाढ झाली आहे. पुढील दोन दिवस तापमानात वाढ होणार आहे. त्यानंतर शेवटच्या आठवडयात तापमानात घट होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!