Type to search

maharashtra जळगाव मुख्य बातम्या

जळगावच्या तापमानाचा पारा 46 अंशावर

Share
जळगाव । विशेष प्रतिनिधी- जळगावकर एप्रिल महिन्यात मे हिट तडाख्याचा अनुभव घेत असून आज 46.31 अंश तापमानाची नोंद झाली आहे. यंदाचे सर्वाधिक तापमान आज नोंदविले गेले आहे. वाढत्या तापमानामुळे रस्त्यावर भर दुपारी शुकशुकाट दिसून येत आहे.दुसरीकडे राज्यात सर्वाधिक उष्ण शहर म्हणून ओळख असलेल्या भुसावळचे तापमानही 46 पर्यंत पोहचले आहे.

त्यामुळे सकाळी 11 वाजेपासून वर्दळीचे रस्ते ओस पडत आहे़ तापमानाने उच्चांक गाठल्याने जळगावकरांना चटके बसत आहे़ सकाळपासूनच उन्हाची दाहकता जाणवत असून सायंकाळी उशिरापर्यंत झळा लागत आहेत. नागरिक शक्य तेवढी कामे लवकर आटोपून घेत आहेत. दुपारनंतर शहरात अघोषित संचारबंदीसारखी स्थिती दिसून येत आहे. मे महिन्यातील तापमान एप्रिलमध्येच अनुभवत आहेत. मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यातच तापमानाने चाळीशी ओलांडली होती. एप्रिलमध्ये देखील दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून आज 46.31 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत असून यापासून बचाव करण्यासाठी थंडगार पाणी, आईस्क्रिम, ऊसाचा रस, लिंबूपाणी, गोला यांचा आसरा घेतला जात आहे. सायंकाळनंतर शीतपेयांच्या दुकानांवर गर्दी दिसून येत आहे.

राज्यात तापमान वाढण्याची शक्यता
सध्या राज्यात असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे पारा वाढण्याची शक्यता असून विदर्भात पारा 45 डिग—ी सेल्सियसच्या पुढे जाण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. तर पुण्यातही पारा 42 डिग—ीपर्यंत पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कमाल तापमाना बरोबरच किमान तापमानात वाढ होत असल्याने रात्रीही उकाडा वाढू लागला आहे. येत्या 30 एप्रिलपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचे हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. वाढलेल्या तापमानामुळे उष्माघातापासून बचावासाठी काळजी घेण्याच आवाहनही पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुराग कश्यप केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!