Wednesday, April 24, 2024
Homeजळगावतरसोद येथे मोफत तांदूळ वाटप ; केशरी कार्डधारकांमध्ये नाराजीचा सूर

तरसोद येथे मोफत तांदूळ वाटप ; केशरी कार्डधारकांमध्ये नाराजीचा सूर

तरसोद, ता.जळगाव –

कोरोना संकटामुळे लॉकडाऊन झालेल्या जनतेला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दिलासा देण्याच प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडी सरकारने तीन महिन्यांचे अन्नधान्य रेशनदुकानावर मोफत उपलब्ध करुन देण्याची सोय केली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली असून या संचारबंदीच्या काळात गरीब नागरिकांची उपासमार होऊ नये, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

- Advertisement -

राज्य शासनाच्या निर्देशानुसार दि.२२ एप्रिल रोजी तरसोद येथील स्वस्त धान्य दुकानात मोफत तांदुळ वाटप केला जात आहे. सोशल डिस्टनचे पालन करत कार्डधारकांना तांदुळ वाटप होत आहे.

यांची होती उपस्थिती
वाटप शुभारंभ प्रसंगी सरपंच सौ.मनिषा मनोज काळे, तलाठी रूपेश ठाकूर, पोलीस पाटील गोकुळ शिरूड, ग्रामसेवक श्री.साळुंखे, कोतवाल ज्ञानेश्वर कोळी, मनोज काळे उपस्थित होते.

धान्य दुकानदारांची कसरत
रेशनवरील मोफत तांदुळावरून ग्रामस्थांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. आपत्ती काळात सर्वांना धान्य मिळावे अशी मागणी नागरीक करत असून नागरीकांच्या या रोषाला धान्य दुकानदारांना सामोरे जावे लागत आहे. राज्य शासनाच्या सूचनेनुसार हा तांदुळ केवळ अंत्योदय, प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांना दिला जात आहे. तर केशरी कार्डधारकांनाही धान्य देण्याचा शासनाचा निर्णय आहे मात्र हे धान्य मे आणि जून महिन्यासाठी देण्यात येणार आहे, मात्र ते मोफत नसेल याची सुध्दा नोंद कार्ड धारकांनी घेणे गरजेचे आहे.

मोफत तांदुळ किंवा धान्य सध्या केशरी कार्डधारकांना मिळत नसल्याने लोक तांदुळ देण्याची मागणी करत आहे. त्यांच्या रोषाला दुकानदारासह सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत राज्व केंद्र सरकारने निर्णय घेण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या