तहसिलदार मॉर्निंग वॉकला गेले अन् ट्रॅक्टर धरून आणले

0
जळगाव । दि.31 । प्रतिनिधी-गिरणा नदी पात्रातून अनाधिकृतपणे मध्यरात्री व पहाटे वाळु वाहतुक सुरु आहे. आज सकाळी तहसिलदार अमोल निकम यांचया मार्निंग वॉक पथकाने मेहरुण व काव्यरत्नावली चौक परिसरातून वाळू वाहतुक करणार्‍या दोन टॅ्रक्टरवर कारवाई करून टॅ्रक्टरचालक व मालकांविरुध्द वेगवेगळया पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, तहसिलदार अमोल निकम हे आपल्या सायकलीने सकाळी फिरायला निघाले.

त्यांना नागझिरी शिवारातून मेहरुणकडे वाळू वाहतुक करणारे 1 ट्रॅक्टर दिसले. यावर त्यांनी ट्रॅक्टर थांबवून कारवाई करीत एमआयडीसी पोलिसात जमा करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर तहसिलदार निकम व तलाठी अनिरुध्द खेतमाळस यांनी सकाळी 9.30 वाजता काव्यरत्नावली चौकात त्यांना एमएच 19 एएन 0352 क्रमांकाचे टॅ्रक्टर व एमएच 19 बीक्यू 0802 क्रमाकांच्या ट्रॉलीतून वाळू वाहतुक करणारे टॅ्रक्टर दिसले.

त्यांनी टॅ्रक्टर थांबवून चालकास परवानाबाबत विचारणा केली असता, टॅ्रक्टरचालकाने परवाना नसल्याचे सांगितले. त्यानंतर तलाठी खेतमाळस यांनी ते टॅ्रक्टर रामानंद नगर पोलिसात जमा करून टॅ्रक्टरचालक सोपान ठाकरे रा. वैजनाथ व मालक मनोज पाटील यांच्याविरुध्द रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली.

ट्रॅक्टर मध्ये दोन हजार रुपये किंमतीची 1 ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी ट्रॅक्टरचालक सोपान ठाकरे याला ताब्यात घेतले आहे.

 

LEAVE A REPLY

*