Type to search

maharashtra जळगाव

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात जळगाव राज्यात 20व्या स्थानी

Share
जळगाव । केंद्र सरकारच्या शहर विकास मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2019’ अंतर्गत करण्यात आलेल्या पाहणीत जळगाव शहराने राज्यात 20 वा तर देशात 76 वा क्रमांक पटकाविला आहे.

बुधवारी हे निकाल देशपातळीवर घोषित करण्यात आले. देशातील 4 हजार 237 शहरांमध्ये 28 दिवस डिजीटल पद्धतीने पाहणी करण्यात आली होती. गेल्या वर्षी जळगाव शहर 84 व्या स्थानी होते. ‘स्वच्छ सर्वेक्षण 2019’ या पाहणीत एकूण चार टप्पे करण्यात आले होते. एकूण 5 हजार गुणांसाठी असलेल्या या स्पर्धेतील चारही टप्पे प्रतिटप्पा 1250 गुणांसाठी होता.

त्यात महापालिकेतर्फे घनकचर्‍यावर करण्यात येणारी प्रक्रिया यासाठी जळगाव महापालिकेला 420 गुण मिळाले आहे. तर स्टार रेटींगअंर्तगत 500 गुण देण्यात आले आहे. प्रत्येक्ष शहराची पाहणी याअंतर्गत सर्वाधिक म्हणजे 1171 गुण महापालिकेला मिळाले आहे. स्वच्छता अ‍ॅप कार्यान्वीत करुन त्याचा वापर कशाप्रकारे केला जातो. यासाठी करण्यात आलेल्या पाहणीत 1250 पैकी 943 गुण मिळाले आहेत.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या जळगाव, धुळे महापालिकापैकी जळगाव महापालिका राज्यात पहिल्या 20 मध्ये आली आहे. केंद्र शासनामार्फत या सर्वेक्षणासाठी स्वतंत्र समिती त्या-त्या महापालिकांच्या हद्दीत येवून पाहणी करते. शहरातील स्वच्छता, घनकचर्‍याचे व्यवस्थापन यासह प्रमुख चौकांमध्ये देखील या समितीने पाहणी केली होती. प्रत्यक्ष पाहणीत जळगाव शहर उजवे ठरल्याने प्रत्यक्ष पाहणी या टप्प्यात सर्वाधिक म्हणजे 1250 पैकी 1171 गुण मिळाले.

शहरातील सर्वात मोठा प्रश्न असलेल्या घनकचरा प्रक्रियेत मात्र शहर मागे असल्याचे या सर्वेक्षणाच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे. तर स्वच्छतेसाठी असलेल्या अ‍ॅपच्या माध्यमातून स्वच्छतेचे प्रश्न मार्गी लावणे व तक्रारींचे निराकरण करणे यातही जळगाव शहर महानगरपालिका सो.सो. असल्याचे सर्वेक्षणाचे स्पष्ट झाले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!