गाळेधारकांचे मुंबईत सुरेशदादांना साकडे

0
जळगाव । दि.29 । प्रतिनिधी-मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील गाळे ताब्यात घेण्याबाबत न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यामुळे गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्रशासाने सुरु केली आहे.
दरम्यान गाळ्यांबाबत न्याय द्यावा, यासाठी गाळेधारकांनी मुंबईत सुरेशदादा जैन यांची भेट घेवून चर्चा केली. दरम्यान गाळेधारकांना सहकार्य करणार असल्याचे आश्वासन सुरेशदादांनी दिले असल्याची माहिती महापौर नितीन लढ्ढा यांनी दिली.

मनपा मालकीच्या 18 व्यापारी संकुलातील 2175 गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपुष्टात आली. गाळे कराराने देण्याबाबत करण्यात आलेल्या ठरावाला शासनाने स्थगिती दिली आहे.

गाळे अद्यापही गाळेधारकांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान दोन महिन्याच्या आत गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया मनपा प्रशासनाने पूर्ण करावी, असे आदेश खंडपीठाने दिले आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने प्रक्रिया सुरु केली. त्यामुळे गाळेधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान काही गाळेधारकांनी मुंबई येथे माजी आ.सुरेशदादा जैन यांची भेट घेवून तोडगा काढण्याची विनंती केली.

यावर कायदेशीर बाबींना धक्का न लावता सहकार्य करणार असल्याचे आश्वासन सुरेशदादा यांनी गाळेधारकांना दिले. तसेच शासनस्तरावर जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन, आ.एकनाथराव खडसे यांच्यासोबत बैठक घेवून चर्चा करण्यास सुरेशदादांनी तयारी दर्शविली असल्याचेही महापौर नितीन लढ्ढा यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*