सुरेश शॉपींग फेस्टीवलमध्ये राकेश सोनी ह्युंडाई इयॉनचे मानकरी

0
जळगाव । दि.28 । प्रतिनिधी-एस-थ्री सुरेश शुटींग अ‍ॅण्ड सारीज्तर्फे घेण्यात आलेल्या सुरेश शॉपींग फेस्टीवलमध्ये राकेश सोनी हे ह्युंडाई इयॉनचे मानकरी ठरले.
एस-थ्री सुरेश शुटींग अ‍ॅण्ड सारीज्तर्फे दि.1 फेब्रुवारी ते 25 जून या कालावधीत सुरेश शॉपींग फेस्टीवल आयोजित करण्यात आला होता.
याअंतर्गत 6 हजार 522 हून अधिक ग्राहकांनी खरेदी केली व 20 हजार 325 अभिप्राय प्रवेशिका वितरीत करण्यात आल्या होत्या.

या प्रवेशिकेत खरेदी करतांनाचे अनुभव व अभिप्राय नोंदवून ग्राहकांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकालाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.

या कार्यक्रमासाठी दै.‘देशदूत’चे संपादक हेमंत अलोने, ज्येष्ठ पत्रकार मिलींद कुळकर्णी, नरेंद्रसिंग सोलंकी, संदीप त्रिपाठी, चेतन शिरपुरकर, महेश जहागिरदार, प्रसाद गिरासे, महापौर नितीन लढ्ढा, ज्येष्ठ विधीज्ञ सुशिल अत्रे, फोर सिझन रिक्रिएशनचे संचालक डॉ.शीतल ओसवाल, माजी सभापती राजकुमार आडवाणी, एस-थ्रीचे संचालक सुरेश हासवानी, राकेश हासवानी हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते 1001 प्रवेशिकांची निवड करण्यात आली.

त्यातून राकेश सोनी हे ह्युंडाई इयॉनचे मानकरी ठरले. तसेच एका शेतकरी कुटुंबाला रेफ्रिजरेटर तर महावीर पंचारिया यांना सोफासेट मिळाला.

एस-थ्री सुरेश शुटींग अ‍ॅण्ड सारिज् यांनी गुणवत्ता आणि विश्वासावर मोठा ग्राहकवर्ग मिळवल्याचे दै.‘देशदूत’चे संपादक हेमंत अलोने यांनी सांगितले.

यावेळी महापौर नितीन लढ्ढा, अ‍ॅड.सुशिल अत्रे, ज्येष्ठ पत्रकार मिलींद कुळकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. परिक्षक म्हणून गिरीश कुळकर्णी, प्रशांत महाशब्दे, विनोद पाटील यांनी काम पाहिले.

 

LEAVE A REPLY

*