Type to search

maharashtra जळगाव

‘हिरकणी महाराष्ट्राची’ योजना विकास पर्वाची सुरुवात

Share
जळगाव । महिला बचत गटांना आणि जनसामान्यांच्या नाविण्यपूर्ण कल्पनांना संधी देणार्‍या हिरकणी महाराष्ट्राची आणि डिस्ट्रीक्ट बिजनेस प्लॅन कॉम्पिटीशन या योजना विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात करणार्‍या लोकोपयुक्त योजना असल्याचे प्रतिपादन केन्द्रीय वाणिज्य आणि उद्योग तथा नागरी उड्डयण मंत्री सुरेश प्रभु यांनी केले.

राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येणार्‍या ‘हिरकणी महाराष्ट्राची’ आणि डिस्ट्रीक्ट बिजनेस प्लॅन कॉम्पिटीशन या योजनांचे अनावरण केन्द्रीय वाणिज्य आणि उद्योग तथा नागरी उड्डयण मंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते मंत्रालय येथील वॉर रुममधून व्हीसीद्वारे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात या व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, कौशल्य विकास अधिकारी श्रीमती अनिसा तडवी यांच्यासह जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील गायकवाड, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, जिल्हा नियोजन कार्यालयाचे लेखाधिकारी श्री देशमुख व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी या योजनाचा व्यापक प्रसार, प्रचार करावा. लोकांच्या सक्रिय सहभागातून या योजना भरीव प्रमाणात यशस्वी कराव्यात. योजनेतील यशस्वी लाभार्थ्यांच्या उपयुक्त नाविन्यपूर्ण कल्पनांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी दिली जाणार आहे.

असी आहे योजना-‘हिरकणी महाराष्ट्राची’ या योजनेमध्य सेवा, वस्तू उत्पादन करणार्‍या महिला बचत गटातून प्रत्येक तालुक्यतून 10 बचत गटांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या बचत गटांना 50 हजाराचा निधी त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना उद्योगात रुपांतरित करण्यासाठी देण्यात येणार आहे. तर जिल्हा स्तरावरुन 5 बचत गटांची निवड करुन त्यांच्या उद्योग उभारणीसाठी 2 लाखांचा निधी देण्यात येणार आहे.

डिस्ट्रीक्ट बिजनेस प्लॅन कॉम्पिटीशन योजनेद्वारा कृषि, सेवा, आरोग्य, तंत्रज्ञान या क्षेत्राशी निगडितउत्कृष्ट कल्पना मांडणार्‍या 5 लाभार्थ्यांची जिल्हास्तरावरुन निवड करण्यात येणार आहे. या 5 नवउद्योजकांना प्रोत्साहनपर 5 लाख रुपयांचे कार्यादेश देण्यात येणार आहे. विभाग स्तरावरील जिल्ह्यातून 15 स्टार्टअपची निवड करता येणार आहे. प्रस्तावांची निवड जिल्हा समितीद्वारे करण्यात येईल, अशी माहिती शल्य विकास उद्योजकता विभागाचे प्रधानसचिव असीम कुमार गुप्ता यांनी यावेळी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!