आरक्षित जमिन घ्या, नाही तर आत्महत्त्येची परवानगी द्या !

0
जळगाव । दि.21 । प्रतिनिधी-मनपाकडून असोदा येथील शिवारातील ट्रक टर्मिनससाठी आरक्षित करण्यात आली होती. या जमिनीच्या भुसंपादनाची तयारी मनपाकडून सुरु करण्यात आली असून यास शेतकर्‍यांनी विरोध दर्शविला आहे.
भुसंपादनासाठी बगाईत जमिन घेण्यापेक्षा एमआयडीसीतील ट्रक टर्मिनससाठी आरक्षीत जमिन घेण्याची भूमीका शेतकर्‍यांनी आयुक्तासांसमोर मांडली.
तसेच होत असलेल्या भुसंपादनाच्या त्रासाला खुप कंटाले असून जिल्हाधिकार्‍यांनी आत्महत्येला परवानगी देण्याची मागणी शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

शहरातील ट्रान्सपोर्ट नगरच्या जागेवर लक्झरी बसेस स्टॉप करुन सध्यास्थितील असलेल्या ट्रान्सपोर्टनगर दुरदर्शन टॉवरजवळ असलेल्या ट्रक टर्मिनसच्या जागेवर हलविण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

यासाठी भूसंपादनासाठी जमिनीची मोजणी करण्यासाठी गेलेल्या महापालिका व भुमिअभिलेखच्या पथकाला जमिन मालक शेतकर्‍यांनी माघरी पाठवून संपदानाला तीव्र विरोध केला आहे.

दरम्यान या 9 हेक्टर जागेवर 7 शेतकर्‍यांची जमिन आहे.त्यावर 20 खातेदार आहेत. भुसंपादन करण्यात येणारी ही बागाईती जमिनी असून ती कसत असल्याने ती दिल्यास शेतकरी भूमीहीन होतील म्हणून संपदानास विरोध त्यांचा विरोध आहे.

आयुक्त जीवन सोनवणे यांच्याकडे हे शेतकरी सुनावणीसाठी आले होते. यावेळी शेतकर्‍यांनी आयुक्तांना एमआयडीसीत पडून असलेली जागा ट्रक टर्मिनससाठी घ्यावी असे सांगीतले.

तसेच संपदनाची कारवाई करीत असलेल्या जमिनीचे नविन महामार्गामुळे दोन भाग पडले आहेत. या जमिनीचा कसा उपयोग होईल असा प्रश्न केला.

जमिनीजवळ अनेक धार्मिकस्थळे आहेत. या जमिनीच्या आरक्षणाचा काही भाग मनपाने जाणिवपूर्वक वगळल्याचा आरोपही शेतकर्‍यांनी केला आहे.

तसेच महमार्गाला लागून असलेली नापिक जमिनीचे संपादन करावे अशी विनंती त्यांनी आयुक्तांकडे केली. तसेच ही जागा संपादीत करुन त्यावर व्यापारी मार्केट करुन ती स्वत:च्या नावावर करुन घेण्याचे छडयंत्र महापालिकेतील काही जण करीत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला.

शेतकरी यांनी दिलेल्या पर्यांयाचा विचार करण्यात येईल. त्याची माहीती मागविण्याचे आश्वासन आयुक्त जीवन सोनवणे यांनी शेतकर्‍यांना दिले.

आयुक्तांनी देखिल आमची भूमिका पटल्याचे शेतकर्‍यांनी सांगीतले. यावेळी अंबादास दुसाने, रविंद्र रोटे, शंकर चौधरी, लहू चौधरी, अनिल भोळे, दिलीप रडे, सुनिल पांडे, शैलेश पांडे, अशोक बर्‍हाटे, सोपान बर्‍हाटे, याच्यासह शेतकरी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*