Type to search

गुरुनानक नगरातील तरुणाची गळफास घेवून आत्महत्त्या

maharashtra जळगाव

गुरुनानक नगरातील तरुणाची गळफास घेवून आत्महत्त्या

Share
जळगाव । शहरातील शनिपेठ भागातील गुरुनानक नगरातील 21 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या तरुणाला नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला मयत घोषित करण्यात आले. प्रसाद नारायण दाबोरे असे मयताचे नाव आहे.

याबाबत नातेवाईक व मित्र परिवारांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रसाद दाबोरे याने गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण केले. त्यानंतर त्याने रात्री घराच्या खोलीतील छताला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना रात्रीच उघडकीस आल्यानंतर त्याला तात्काळ खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुतार यांनी तपासणीअंती त्याला मयत घोषित केले. याबाबत शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस कर्मचारी रघुनाथ महाजन करीत आहे. दरम्यान, प्रसाद याने आत्महत्या का केली? याबाबतचे कारण समजून आले नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!