Type to search

मानसिक तणावातून तरुणाने गळफास घेवून संपविली जीवनयात्रा

maharashtra जळगाव

मानसिक तणावातून तरुणाने गळफास घेवून संपविली जीवनयात्रा

Share
जळगाव । शहरातील दांडेकर नगरात राहणार्‍या 24 वर्षीय तरुणाने मानसिक तणावातून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. तरुणाने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहीली असून त्यात मानसिक तणावात असून आत्महत्या करीत आहे. याला कुणालाही जबाबदार धरु नये असा लिहीले होते. तरुणाच्या आत्महत्येबाबत रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जयेश रमेश मोतीराया वय 24 असे मयताचे नाव आहे.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जयेश मोतीराया याचे बीएड पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्याने तो गेल्या काही दिवसांपासून नोकरीच्या शोधात होता. त्यातच मागील तीन महिन्यांपूर्वी त्याच्या वडीलांचे निधन झाल्याने कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याच्या दोन्ही बहीणाचा विवाह झाला होता. त्यामुळे जयेश व त्याची आई हे दोघेच राहत होते. मंगळवारी सायंकाळी त्याची आई समर्थांच्या बैठकीठिकाणी गेली असल्याने जयेश घरात एकटाच होता. त्यामुळे त्याने राहत्या घरात छताला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार त्याच्या आईच्या लक्षात आल्यानंतर आईच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर जयेशच्या आईने आक्रोश केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी याठिकाणी धाव घेवून घटनेची माहिती पोलीसांना दिली. घटनास्थळी रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी निलेश सुर्यवंशी यांनी धाव घेतली. दरम्यान मृतदेह खाली उतरविल्यानंतर त्याच्याजवळ सुसाईड नोट मिळून आली. त्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला.

माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका!
जयेश याने दीड वर्षापूर्वी देखील रेल्वेसमोर उभे राहून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून त्याच्या घरचे त्याला एकटे सोडत नव्हते. गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावात असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. आत्महत्या करणे हे पाप आहे पण मी मानसिक तणावाला कंटाळलो असल्याने आत्महत्या करीत आहे. याला कुणालाही जबाबदार ठरवू नये असे सुसाईड नोटमध्ये आत्महत्येपूर्वी लिहीले होते. ही सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली आहे. याबाबत रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!