Type to search

maharashtra जळगाव फिचर्स

कंजरवाड्यात तरुणीची आत्महत्या

Share

जळगाव  – 

शहरातील कंजरवाड्यातील 19 वर्षीय तरुणीने कंजरभाट समाजातील जातपंचायतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 11.30 वाजता उघडकीस आली.

याप्रकरणी पोलिसांनी मयताच्या नातेवाईकांचे जाबजबाब नोंदविण्याचे काम सुरु होते. मानसी उर्फ मुस्कान आनंद बागडे असे मयत तरूणीचे नाव आहे.

कंजरभाट जातपंचायतीचे वरिष्ठ सरपंच दिनकर बागडे यांचा मोठा मुलगा आनंद बागडे याला एकूण चार आपत्ये आहेत. त्या पैकी  मानसी बागडे ही 12 वीचे शिक्षण घेत होती. दहावीच्या परीक्षेत ती शाळेतून प्रथम आली होती.

मुलगी हुशार व आज्ञाधारक होती, अशी चर्चा कंजरवाड्यात रंगली होती. दरम्यान दरम्यान मानसी हीने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला.

ही आत्महत्या नेमकी कशामुळे झाली याचा उलगडा झाला नसला तरी मानसी ही आनंद बागडे यांनी केलेल्या प्रेमविवाहातून झालेले आपत्य असल्यामुळे कंजरभाट समाजाच्या रीती रिवाजाप्रमाणे तीचा विवाह करण्यास आजोबांचा विरोध असल्याची चर्चा कंजरवाडा परिसरात रंगली होती.

यातून आलेल्या तणावामुळेच तीने गळफास घेतल्याचेही बोलले जात होते. मानसीचा कोल्हापूर येथील तरुणाशी रविवारी साखरपुडा होणार होता.

 

 पोलीस अधीक्षकांना निवेदन

जातपंचायतीच्या जाचक अटीमुळे मानसी बागडे या तरुणीने आत्महत्या केल्याचा आरोप झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देवून सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यांतर्गत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी..एस.कट्यारे, विश्वजीत चौधरी, अ‍ॅड. भरत गुजर, अशफाक पिंजारी, जितेंद्र धनगर, अ‍ॅड.डी.एस.भालेराव, आर.एस.चौधरी उपस्थित होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!