विराट अव्वलस्थानी

0
दुबई । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी कसोटी फलंदाजांच्या यादीमध्ये अव्वलस्थान पटकावले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात केलेल्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला मागे टाकत विराटने अव्वलस्थानी झेप घेतली आहे.

आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत आता विराट कोहली 934 गुणांसह अव्वलस्थानी आहे. तर चेंडू छेडछाड प्रकरणामुळे 1 वर्षाच्या निलंबनाची शिक्षा भोगत असलेला आॉस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ या यादीमघ्ये 927 गुणांसह दुसर्‍या स्थानी. तर इंग्लंडचा जो रुट 865 गुणांसह तिसर्‍या स्थानी आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात केलेल्या 149 आणि 51 धावांच्या खेळीमुळे कोहलीला 31 गुणांची मदत मिळाली. यामुळे 67 कसोटी सामन्यांनंतर पहिल्यांदाच कोहलीने अव्वलस्थानी धडक मारली.

आयसीसी क्रमवारीमध्ये सर्वाधीक गुण मिळवणार्‍या भारतीय फलंदाजांच्या यादीतही कोहली अव्वलस्थानी पोहचला आहे. तसेच इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात कोहलीने आपल्या कामगिरीत सातत्य राखले तर त्याला जॅक, कॅलिस, एबी डिव्हिलियर्स यांचा 935 गुणांचा विक्रम मोडता येईल.

अव्वल गुण पटकावणार्‍यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू सर डॉन ब—ॅडमन (966 गुण) अव्वलस्थानी आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (947 गुण) दुसर्‍यास्थानी आहे. आजवर भारतीय कसोटी क्रिकेटपटूमध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग, दिलीप वेंगसरकर आणि सुनिल गावस्कर यांनी आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वलस्थान पटकावले आहे. आता विराट कोहलीही त्यांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसला आहे.

LEAVE A REPLY

*