टेनिस : मरे वॉशिंग्टन ओपनच्या दुसर्‍या फेरीत

0
वॉशिंग्टन। माजी जागतीक क्रमवारीता बि—टेनचा खेळाडू अँडी मरेने स्थानीय अमेरिकन खेळाडू मॅकेंजी मॅक्डोनाल्डला पराभूत करुन वॉशिंग्टन ओपनच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे.

जखमेमधून पूर्णपणे न सावरला गेल्याने तिसरी ग—ॅडस्लॅम स्पर्धा विम्बलंडनमधून माघार घेतल्यानंतर प्रथमच मैदानवर उतरलेल्या मरेने वॉशिंग्टन ओपनच्या पहिल्या फेरीत मॅक्डोनाल्डला 3-6, 6-4, 7-3 ने पराभुत केले दुसर्‍या फेरीत मरेचा सामना त्याच्याच देशाचा खेळाडू अ‍ॅडमंडशी होईल.

अ‍ॅडमडने या आधी मरेला या वर्षी ईस्टबर्नमध्ये पराभूत केले होते. बि—टेनचा 31 वर्षीय मरे या महिन्यात डाव्या हिपला झालेल्या जखमेतून सावरला नसल्याने विम्बलंडमध्ये खेळू शकला नाही.

मरेने या आधी जूनमध्ये क्वीस क्लबमध्ये पुनर्गमन केले होते आणि तो त्यांचा एक वर्षानंतरची पहिली स्पर्धा होती. परंतु तो पहिल्याच फेरीत पराभूत झाला होता.

या दरम्यान पुढील महिन्यात सुरु होत असलेल्या सिनसिनाटी ओपनमध्ये मरेला वाइल्ड कार्ड दिले गेले आहे. सिनसिनाटी ओपन स्पर्धा मरेसाठी अमेरिकी ओपनच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी खूप चांगली संधी असेल. वर्षातील शेवटी चौथी ग—ँड स्लॅम स्पर्धा अमेरिकी ओपनची सुरुवात 27 ऑगस्ट पासून सुरु होत आहे.

LEAVE A REPLY

*