सायनाची विजयी सलामी, पुढच्या फेरीत धडक

0

नानजिंक। चीनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने पहिल्या फेरीत विजय मिळवला आहे. महिला एकेरीत मंगळवारी झालेल्या सामन्यात सायनाने तुर्कीच्या अली डेमीबर्गचा 21-17, 21-8 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजयासह सायनाने पुढच्या फेरीत धडक मारली आहे.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आपला पहिलाच सामना खेळणार्‍या सायनाला प्रतिस्पर्धी अली डेमीर्बगकडून चांगलाच प्रतिकार सहन करावा लागला. पहिल्या सेटमध्ये अलीने सायनाला चांगलचं दमवलं. पहिल्या काही मिनीटांमध्ये अलीने सायनावर 1-2 गुणांची निर्णायक आघाडी घेतली होती.

पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत अलीने 11-10 अशी नाममात्र आघाडी कायम ठेवली. मात्र मध्यांतराआधी सूर हरवलेल्या सायनाने आपल्या खेळात बदल केला. आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत सायनाने अलीवर कुरघोडी करायला सुरुवात केली. ड्रॉप आणि स्मॅशच्या फटक्यांचा सुरेख वापर करत सायनाने पहिल्या सेटमध्ये पुनरागमन करत आघाडी घेतली.

अलीने सायनाशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र सायनाने वेळेतच 21-17 च्या फरकाने पहिला सेट आपल्या नावावर करत सामन्यामध्ये आघाडी घेतली.दुसर्‍या सेटच्या सुरुवातीपासूनच सायनाने आपला आक्रमक खेळ कायम ठेवला. तिच्या या चालीपुढे अली पुरती भांबावून घेतली. दोन्ही खेळाडूंमध्ये काही चांगल्या रॅली रंगताना दिसल्या.

मात्र सायनाने चतुराईने काही गुणांची कमाई करत 4-5 गुणांची भक्कम आघाडी आपल्याकडे कायम राखली. नेटजवळचे काही फटके खेळत सायनाने तुर्कीच्या अलीला चांगलचं दमवलं. दुसर्‍या सेटच्या मध्यांतरापर्यंत सायनाने 11-4 अशी भक्कम आघाडी आपल्याकडे कायम राखली होती.

LEAVE A REPLY

*