विराटला कसोटीत अव्वल स्थानी झेप घेण्याची संधी

0
मुंबई। भारताची इंग्लंडविरुध्दची कसोटी मालिका उद्यापासून सुरु होत आहे. भारताने टी-20 मालिकेत चांगली कामगिरी केली होती तर इंग्लंडने एकदिवसीय मालिका जिंकत भारताला कसोटी मालिका तितकीशी सोपी नसल्याचे संकेत दिले. त्यातच आता पहिल्या कसोटी सामन्याला काही तासच उरले असताना भारताच्या कर्णधाराला इंग्लंडच्या जलदगती गोलंदाजांनी आव्हान दिले आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. कसोटी क्रिकेटमध्येही विराट नंबर वन बनण्याच्या तयारीत आहे. ऑॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ सध्या कसोटी क्रिकेटमध्ये क्रमवारील अव्वल स्थानी आहे. मात्र बॉल टेम्परिंगप्रकरणी स्मिथवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यावर वर्षभर बंदी आहे. त्यामुळे विराटला कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर कब्जा करण्याची मोठी संधी आहे.

इग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत स्टिव्ह स्मिथला पछाडण्याची संधी विराटला मिळणार आहे. इंग्लंड दौर्‍यात भारत 5 कसोटी सामने खेळणार आहे. स्मिथ सध्या कोहलीच्या 26 अंक पुढे आहे. त्यामुळे स्मिथला मागे टाकण्यासाठी विराटला मालिकेत चांगलं प्रदर्शन करावं लागणार आहे.

आसीसीच्या क्रमवारीत पहिल्या 50 खेळाडूंमध्ये भारताचे आणि इंग्लंडचे प्रत्येकी पाच-पाच खेळाडू आहेत. या यादीत भारताचा चेतेश्वर पुजार सहाव्या, लोकेश राहुल 11व्या, अजिंक्य रहाणे 19व्या, मुरली विजय 23व्या आणि शिखर धवन 24व्या स्थानावर आहे. तर इंग्लंडचा जो रुट तिसर्‍या, अ‍ॅलिस्टर कूक 13व्या, जानी बेयरस्टा 16व्या, बेन स्टोक्स 28व्या, मोईन अली 43व्या स्थानावर आहे.गोलंदाजीत इंग्लंडचा जलद गोलंदाज जेम्स अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानावर आहे. स्टुअर्ट ब—ॉड या यादीत 12व्या स्थानावर आहे. तर भारताचे सहा गोलंदाज पहिल्या 30 मध्ये आहेत. रविंद्र जडेजा तिसर्‍या स्थानावर आहे.

भारतासाठी सर्वात खडतर दौरा म्हणून इंग्लंड दौर्‍याकडे पाहिले जाते. या दौर्‍यात भारताच्या फलंदाजांची खरी कसोटी लागते. या दौर्‍यात जो फलंदाज चांगली कामगिरी करेल तो हिरो ठरतो आणि जो खराब खेळेल तो टीकेचा धनी ठरतो. 2014 च्या इंग्लंड दौर्‍यावर विराटचा खराब फॉर्मवरुन फार गदारोळ झाला होता. तो सातत्याने स्लिपमध्ये आऊट होत होता. त्याला जेमी अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या जोडगोळीने चांगलेच जेरीस आणले होते. विराटने 2014च्या दौर्‍यात पाच कसोटी सामन्यात 13.40 च्या सरासरीने फक्त 134 धावा केल्या होत्या. हाच अपयशाचा डाग या दौर्‍यात पुसण्यासाठी विराट सज्ज झाला आहे.

परंतु याही दौर्‍यात अँडरसन आणि ब्रॉड या जोडगोळीने विराटला पुन्हा आव्हान दिली आहे. नुकताच तंदुरुस्त झालेल्या स्टुअर्ट ब्रॉडने याही दौर्‍यात आम्ही विराटला बाद करण्यासाठी विशेष रणनिती आखल्याचे सांगितले. तो म्हणाला की, प्रतिस्पर्धी संघातील एखाद्या महत्वाच्या फलंदाजाला एकटा गोलंदाज कधीही बाद करु शकत नाही त्यासाठी दुसर्‍या बाजूने गोलंदाजी करणार्‍या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करुन दबाव निर्माण करावा लागतो. आशाच प्रकारची रणनिती आम्हाला विराटची शिकार करण्यासाठी वापरावी लागेल.

आर अश्विन पाचव्या, मोहम्मद शमी 17व्या, भुवनेश्नर कुमार 25व्या ईशांत शर्मा 26व्या आणि उमेश यादव 28व्या स्थानावर आहे.कसोटी क्रिकेटमध्ये क्रमवारीत भारतीय संघ 125 अंकांसह पहिल्या स्थानावर आहे, तर इंग्लंड 97 अंकांसह पाचव्या स्थानावर आहे. इंग्लड आणि भारत यांच्या 28 अंकाचा फरक आहे.

LEAVE A REPLY

*