सौरभ वर्माला विजेतेपद

0
मॉस्को । भारताचा माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेता सौरभ वर्माने रशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम फेरीत सौरभने जपानच्या कोकी वाटांबेची झुंज 19-21, 21-12, 21-17 अशा 3 सेट्समध्ये मोडून काढली.

दुसरीकडे मिश्र दुहेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या जोडीला मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. रोहन कपूर आणि कुहू गर्ग जोडीला रशिया आणि कोरियाच्या जोडीने 19-21, 17-21 असं हरवलं.

पहिल्या सेटमध्ये वाटांबेने सौरभ वर्माला बॅकफूटलला ढकललं. पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत वाटांबेकडे 11-5 अशी आघाडी होती. मध्यंतरी सौरभ वर्माने वाटांबेला चांगली लढत दिली, मात्र वाटांबेने पुन्हा एकदा आघाडी मिळवत पहिला सेट 19-21 च्या फरकाने खिशात घातला. यानंतर दुसर्‍या सेटमध्ये सौरभने वाटांबेला पराभूत करुन सामन्यात बरोबरी साधली. निर्णायक सेटमध्ये कोकी वाटांबेने पुन्हा एकदा आपला पहिला फॉर्म मिळवत सौरभला चांगलीच टक्कर दिली.
सौरभ वर्माच्या या विजयानंतर त्याच्यावर अभिनंदनाच वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

*