बांग्लादेशने मालिका जिंकली

0
सेंट किट्स । आपला अनुभवी खेळाडू तमीम इकबाल (103), महमुदुल्ला (नाबाद 67) आणि कर्णधार मशरफे मुर्तजा (263) च्या बळावर बांग्लादेश क्रिकेट संघाने शनिवारी खेळलेल्या अंतिम एकदिवसीय सामन्यात वेस्टइंडीजला 18 धावांनी हरवले.

या विजयासह बांग्लादेशने तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेला 2-1 ने जिंकून कसोटी मालिकेत मिळालेल्या पराभवाचा बदला पूर्ण केला. बांग्लादेशचे हे वेस्टइंडीजमध्ये यजमान संघाविरूद्ध एकदिवसीय मालिकेत दुसरा विजय आहे.
वॉर्नर पार्कमध्ये खेळलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून बांग्लादेशने अगोदर फलंदाजीचा निर्णय घेतला आणि सलामी फलंदाज तमीमने 35 च्या स्कोरवर अनामुल हक (10) बाद झाल्यानंतर शाकिब अल-हसन (37) सोबत 81 धावांची भागीदारी करून संघाला मजबुती दिली. शाकिबला 116 च्या स्कोरवर ऐ नर्सने बाद केले. यानंतर तमीमसोबत देण्यासाठी आलेल्या मुश्फिकुर रहीम (12) लाही नर्सने त्रिफळाबाद करून तंबुचा मार्ग दाखवला.

महमुदुल्लासोबत चौथ्या गडीसाठी 48 धावा बनऊन तमीमही देवेंद्र बिशूद्वारे बाद होऊन तंबुत परतले. त्याने 124 चेंडुत सात चौकार आणि दोन षटकार मारले. येथून महमुदुल्लाने नाबाद राहून बांग्लादेशच्या डावाला संभाळले. त्याने मुर्तजासोबत 53 धावा जोडल्या आणि संघाचा स्कोर 253 पर्यंत पोहचवले. या स्कोरवर जेसन होल्डरने मुर्तजाला तंबुत पाठवले. 279 च्या स्कोरवर सब्बीर रहमान (12) ही बाद झाला.

मोसाद्देक हुसैन (11) ने महमुदुल्लासोबत नाबाद राहून निश्चित षटकाच्या समाप्तीपर्यंत 301 धावा बनवल्या. महमुदुल्लाने 49 चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकार मारले. बांग्लादेशचे सहा गडी बाद करण्यात कर्णधार होल्डर आणि नर्सने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. दोघांनी दोन-दोन गडी बाद केले, तसेच शेल्डन कोटरेल आणि बिशूने एक-एक गडी बाद केला. ध्येयाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वेस्टइंडीजने डावाची चांगली सुरूवात केली.

क्रिस गेल (73) ने एविन लेविससोबत 53 धावा जोडल्या. मुर्तजाने या स्कोरवर लेविसला तंबुचा मार्ग दाखऊन बांग्लादेशसाठी महत्त्वपूर्ण गडी बाद केला. गेलने शाई होप (64) सोबत दुसर्‍या गडीसाठी 52 धावांची भागीदारी करून संघाला 100 च्या पलीकडे पोहचवले. येथे हुसैनने गेलला बाद करून दुसरे मोठे यश प्राप्त केले. बांग्लादेशच्या संघाने दोन महत्त्वपूर्ण गडी बाद केले, परंतु वेस्टइंडीजकडे अजूनही अनुभवी फलंदाज बाकी होते. होपने गेल बाद झाल्यानंतर शिमरोन हेटमेर (30) सोबत 67 धावा जोडल्या आणि स्कोर 172 पर्यंत पोहचवले.

मेहदी हसनने या स्कोरवर हेटमेरला तंबुत पाठवले.
हेटमेरनंतर वेस्टइंडीजच्या डावाला संभाळण्यासाठी आलेला कीरन पोवेल 4 धावा बनऊन धावबाद झाला. यानंतर रोवमेन पोवेल (नाबाद 74) ने डावाला संभाळण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही आणि यामुळे वेस्टंडीजला 18 धावांनी मालिका गमवावी लागली होती. बांग्लादेशसाठी मुर्तजाच्या व्यतिरिक्त हसन, रहमान व हुसैनने एक-एक गडी बाद केला.

तमीमला सामनावीर निवडण्यात आले आणि सामन्यात मालिकाविरचा पुरस्कार मिळाला. वेस्टइंडीज आणि बांग्लादेशमध्ये तीन टी-20 सामन्याची मालिका 31 जुलैपासून सुरू होईल. ही मालिका प्रतिष्ठेची असेल.

LEAVE A REPLY

*