फिरकीपटू कुलदीपचे विराटकडून कौतुक

0
नॉटिंगहॅम । पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. आपल्या फिरकीच्या बळावर इंग्लंडच्या 6 फलंदाजांना तंबूत पाठवणार्‍या कुलदीप यादवचे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने तोंडभरून कौतुक केले आहे. याशिवाय आगामी काळात या मचायनामॅनफला विराटकडून मोठे बक्षीसही मिळू शकते.

आम्ही खूपच चांगली कामगिरी केली. कुलदीपसारखी उत्कृष्ट गोलंदाजी गेल्या काही दिवसांत तरी पाहिली नाही. तो सामना जिंकून देऊ शकतो. त्यामुळे त्याने आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी असे आम्हाला वाटत होते, असे विराट म्हणाला. फिरकी गोलंदाज कुलदीपने या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

त्याने इंग्लंडचे सहा गडी तंबूत पाठवून कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. सामन्यानंतर विराटनेही कुलदीपच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. या कामगिरीमुळे कुलदीपला मबक्षीसफ म्हणून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळू शकते, असे संकेत खुद्द विराटनेच दिले. कसोटी संघात अनेकांना आश्चर्यचकित करणारी नावे असू शकतात. संघ निवडीला बराच वेळ आहे. फिरकी गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांची उडणारी दाणादाण पाहता कसोटी संघात निवड करण्याचा मोह आम्हाला होऊ शकतो, असे सांगत त्यानं कुलदीपला संधी देण्याचे संकेत दिले.

इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. कुलदीप भारताकडून फक्त दोन कसोटी सामने खेळला असून, चहलला अद्याप संधी मिळालेली नाही. पुढील दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये कुलदीप आणि चहल चमकले, तर त्यांना कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*