यादवची फिरकी अन् इंग्लडची गिरकी

0
नोटिंगहम । कुलदीप यादवच्या फिरकी गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी पुन्हा लोटांगण घातलं. 49.5 षटकामध्येच इंग्लंडचा संघ 268 धावांवर बाद झाला. भारता समोर विजयासाठी 269 धावांचे माफक आव्हान आहे.

कुलदीप यादवनं 10 षटकामध्ये फक्त 25 धावा देऊन इंग्लंडचे 6 गडी बाद केले. तर उमेश यादवने दोन, युझवेंद्र चहलने एक गडी बाद केला आणि एक खेळाडू धावबाद झाला.

आजच्या सामान्यामध्ये भारतानं नाणेफेक जिंकून पहिले क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीला आलेल्या इंग्लंडनं चांगली सुरुवात केली. 10 षटकामध्येच इंग्लंडची धावसंख्या 70 पेक्षा जास्त होती. पण कुलदीप यादव गोलंदाजीला आल्यावर त्याने इंग्लंडला धक्के द्यायला सुरुवात केली. आणि इंग्लंडचा डाव सावरलाच नाही.

इंग्लंडकडून जॉस बटलरनं 51 चेंडूंमध्ये सर्वाधिक 53 धावांची खेळी केली. तर बेन स्टोक्सनं 103 चेडूंमध्ये 50 धावा केल्या. सलामीला आलेल्या जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोनं प्रत्येकी 38 धावा केल्या.

3 वनडे मॅचच्या या सीरिजची पहिली मॅच नोटिंगहमच्या ट्रेन्ट बि—जमध्ये खेळवण्यात येत आहे. 269 रनचा पाठलाग करून सीरिजमध्ये 1-0नं आघाडी मिळवण्याची संधी भारताला आहे. इंग्लंडला लोळवणार्‍या कुलदीप यादवनं अनेक रेकॉर्डनाही गवसणी घातली आहे. वनडे क्रिकेटमध्ये डावखुर्‍या स्पिनरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. इंग्लंडमध्ये कोणत्याही स्पिनरची ही सर्वोत्तम बॉलिंग आहे. इंग्लंडविरुद्ध कोणत्याही स्पिनरची सर्वात चांगली कामगिरी आहे.

तर भारताकडून ही चौथी सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी 2014 साली मीरपूरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये स्टुअर्ट बिनीनं 4 रन देऊन 6 विकेट घेतल्या होत्या. कुंबळेनं 1993 साली वेस्टइंडिजविरुद्ध कोलकात्यामध्ये 12 रन देऊन 6 विकेट घेतल्या होत्या. 2003 सालच्या वर्ल्ड कपमध्ये आशिष नेहरानं 23 रन देऊन इंग्लंडच्या 6 बॅटसमनना माघारी पाठवलं. आता कुलदीपनं 25 रन देऊन 6 विकेट घेतल्या.

इंग्लंडने दिलेल्या 269 धावांचा पाठलाग करताना भारताच्या रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने डावाची आक्रमक सुरुवात केली. या दोघांच्या फटकेबाजीमुळे भारताने लवकरच 50 धावांचा टप्पा ओलांडला. मोईन अलीच्या गोलंदाजीवर राशिद अलीकडे झेल देत धवन माघारी परतला. शिखर धवन माघारी परतल्यानंतर रोहित शर्माने विराट कोहलीच्या साथीने संघाचा डाव सावरत अर्धशतकी खेळी केली. शेवटची बातमी हाती आली

तेव्हा विराटच्या साथीने अर्धशतकी भागीदारी करत रोहितने सामन्यावर भारताचं वर्चस्व कायम राखल्याचे वृत्त आहे. 32 षटकात भारताच्या एक बाद 224 धावा झाल्या होत्या. रोहित शर्माने 82 चेंडूत 3 षटकार व 12 चौकारांसह आपले 18 वे शतक साजरे केले.

LEAVE A REPLY

*