भारताने टी-20 मालिका जिंकली

0
ब्रिस्टाल । भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने केलेल्या आक्रमक शतकाच्या जोरावर भारताने तिसर्‍या टी-20 सामन्यात विजय मिळवला आहे. इंग्लंडने दिलेलं 199 धावांचं आव्हान भारताने रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर सहज पूर्ण केलं.

रोहितने 56 चेेंडूत नाबाद 100 धावांची खेळी केली. या खेळीत रोहितने 11 चौकार आणि 5 उत्तुंग षटकार खेचले. इंग्लंडचे सर्व गोलंदाज आज रोहितसमोर निष्प्रभ ठरले. सलामीवीर शिखर धवन माघारी परतल्यानंतर रोहितने लोकेश राहुल,

विराट कोहली आणि हार्दिक पांड्या सोबत छोटेखानी भागीदार्‍या रचत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने आपल्या इंग्लंड दौर्‍याची सुरुवात विजयाने केली आहे. यानंतर होणार्‍या वन-डे व कसोटी सामन्यांच्या मालिकेतही भारतीय संघ अशीच कामगिरी करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

तत्पुर्वी विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय चांगलाच उलटला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी तिसर्‍या टी-20 सामन्यात भारताच्या गोलंदाजांची धुलाई करत 198 धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर जेसन रॉय आणि जोस बटलर यांनी पहिल्या चेंडूपासून भारतीय गोलंदाजीवर आक्रमण करायला सुरुवात केली.

विशेषकरुन रॉयने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत सर्वच भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल केला. जेसन रॉयने 31 चेंडूंमध्ये 67 धावांची खेळी केली. सलामीची जोडी माघारी परतल्यानंतर कर्णधार मॉर्गन लवकर माघारी परतला. मात्र यानंतर प्रत्येक इंग्लिश फलंदाजाने आपल्या वाटेला आलेली जबाबदारी चोखपणे बजावत संघाला 198 धावांचा टप्पा गाठून दिला.आज गोलंदाजीसोबत भारतीय क्षेत्ररक्षकांनीही चांगलीच निराशा केली. हार्दिक पांड्याला सामन्यात सर्वाधिक 4 बळी मिळाले, मात्र यासाठी त्याला 38 धावा मोजाव्या लागल्या. याव्यतिरीक्त सिद्धार्थ कौलने 2 तर दिपक चहर आणि उमेश यादवने प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

रोहित शर्मा, हीट मॅन नावाने प्रसिद्ध आहे. भारतासाठी हा सहावा मालिका विजय ठरला आहे. त्याचबरोबर विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारताने ट्वेन्टी-20 मालिकेत अपराजित पाहण्याचाही विक्रम केला आहे. तिसर्‍या सामन्यात विजय मिळवत भारताने ही मालिका 2-1 अशा फरकाने खिशात टाकली आहे. रोहितने 58 चेंडूंत 11 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद 100 धावांची अफलातून खेळी केली.

LEAVE A REPLY

*