इंडोनेशियन ओपन स्पर्धा सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक

0
जकार्ता । ऑलिम्पिक रौप्य विजेती भारताची स्टार खेळाडू पीव्ही सिंधू हिने आपल्या 23 व्या जन्मदिनी विजयोत्सव साजरा केला. सिंधूने इंडोनेशिया ओपन बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुपर 1000 स्पर्धेत जपानच्या आया ओहोरी हिचा पराभव केला.

सरळ दोन सेटमध्ये झालेल्या या लढतीत 17 व्या मानांकित आहोरीवर सिंधूने 21-17, 21-14 असा विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत तिसर्या क्रमावर असणार्या सिंधूने या विजयासह इंडोनेशिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरुषांमध्ये एचएस प्रणॉयनेही चीनी तैपईच्या प्रतिस्पर्ध्यावर मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

आज दुसर्‍या फेरीत सिंधूची लढत जपानच्या अया ओहोरी हिच्याशी होती. सिंधूला या स्पर्धेत तिसरे मानांकन देण्यात आले असून तिचा सलामीचा सामना बिगरमानांकित चोचुवाँगशी होता. तो सामना जिंकल्यामुळे हा सामना तिच्यासाठी तुलनेने सोपा होता. पहिल्याच गेममध्ये सिंधूने चांगली सुरुवात केली. आणि गेम 21-17 असा जिंकला.

दरम्यान, गेल्याच आठवड्यात सिंधू मलेशिया ओपनच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली होती. अलिकडच्या 5 सामन्यांमध्ये या जपानी प्रतिस्पर्धीवर सिंधूने पाचव्यांदा विजय मिळविला. आता तिची पुढील फेरीत थायलंडच्या बुसानन ओंगबामरुगफान किंवा चीनच्या बिंग जियाओ हिच्याशी लढत होईल. तर पुरुषांच्या लढतीत भारताच्या एचएस प्रणॉयने चीनी तैपईच्या वांग झू याला 21-23, 21-15, 21-13 अशा फरकाने पराभूत केले.

आता त्याचा सामना तिसरे मानांकन प्राप्त चीनच्या शी युकी याच्याशी होणार आहे. दुसर्‍या गेममध्ये सामना अटीतटीचा होईल, अशी प्रेक्षकांना अपेक्षा होती. पण या गेममध्येही सिंधूने आपले वर्चस्व राखले. हा गेम सिंधूने 21-14 असा जिंकला. त्यामुले सामना तिसर्‍या गेमपर्यंत खेळावंच लागला नाही. केवळ 36 मिनिटात सिंधूने सामना जिंकत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

LEAVE A REPLY

*