बॉल टेम्परिंग : दोषींना होणार कठोर शिक्षा

0
डबलिन । सध्या वाढणार्‍या बॉल टेम्परिंगच्या घटना रोखण्यासाठी अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) कडक भुमिका घेतली आहे. या प्रकरणात दोषी आढळणार्‍यांवर आता सहा कसोटी किंवा 12 एकदिवसीय सामन्याची बंदी लावण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे.

आयसीसीने वार्षिक बैठकदरम्यान हा निर्णय घेतला आणि आचारसहिंतेत बदल करण्यात आला. नवीन नियमानुसार लेेव्हल-2 चे आरोपाचे अपग्रेड करून आता लेेव्हल-3 चा गुन्हा करण्यात आला. अगोदर आठ निलंबन अंक मिळाल्यावर खेळाडूवर चार कसोटी किंवा आठ एकदिवसीय सामन्याची बंदी लावली होती.

परतु आता याला वाढवून 12 निलंबन अंक करण्यात आले. ज्या अंतर्गत आता खेळाडूवर सहा कसोटी किंवा 12 एकदिवसीय सामन्याची बंदी लावली जाईल.

मार्चमध्ये दक्षिण अफ्रिकेत स्टीवन स्मिथ, डेविड वॉर्नर आणि कॅमरून बेनक्राफ्टला बॉल टेम्परिंगचे दोषी आढळल्या नंतर आयसीसीला लेवल-3 आरोपीची शिक्षा आणि कठोर बनवण्यावर विवश व्हावे लागले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) बाल टेम्परिंग मामल्यात स्मिथ आणि वॉर्नरवर एक-एक वर्षाची जेव्हा की बेनक्राफ्टवर नऊ महिन्याची बंदी लाऊन ठेवली. आताच्या दिवसात श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमलवरही बाल टेम्परिंग मामल्यात एक सामन्याची बंदी लावण्यात आली होती.

माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, आयसीसी आता आचारसहिंतेचे उल्लंघन मामल्यात कठोर कारवाई करेल. बैठकीत मुख्य कार्यकारी डेविड रिचर्डसनही उपस्थित होते. क्रिकेट समितीने हे म्हटले की, मॅच रेफरी आता लेेव्हल-1, 2 आणि लेेव्हल-3 नुसार लावलेल्या आरोपाची सुनावणी करेल. या व्यतिरिक्त खेळांडुचे खराब वर्तनासाठी कठोर बंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

LEAVE A REPLY

*