अ‍ॅरॉन फिंचची वादळी खेळी : सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम

0
हरारे । हरारे येथे सुरू असलेल्या टी-20 तिरंगी मालिकेत ऑॅस्ट्रेलियाच्या अ‍ॅरॉन फिंचने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात 172 धावांची वादळी खेळी केली. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा आपलाच 156 धावांचा विक्रम त्याने आज मोडीत काढला आहे.

अ‍ॅरॉन फिंचने या सामन्यात प्रतिस्पर्धी गोलंदाजांची अक्षरश: पिसे काढली. चौफेर फटकेबाजी करत त्याने 76 चेंडूंमध्ये 172 धावांची खेळी साकारली. या खेळीत फिंचने 16 चौकार आणि 10 षटकार लगावले. फिंचच्या या वादळी खेळीच्या जोरावर ऑॅस्ट्रेलियाने झिम्बाब्वेपुढे 229 धावांचा डोंगर उभा केला. ऑॅस्ट्रेलियाच्या सलामीविरांची 200 धावांची विश्वविक्रमी भागीदारी केली.

फिंचने (172) तर शॉर्टने (46) धावा करत 223 धावांची विश्वविक्रमी भागीदारी रचली. आंतरराष्ट्रीय टी -20 क्रिकेटमधील पहिली 200 धावांची भागीदारी करण्याचा विक्रम आता फिंच आणि शॉर्टच्या नावावर आहे. फिंच याने यापूर्वी इंग्लंडविरुद्ध 63 चेंडूंमध्ये 156 धावांची खेळी केली होती. हा स्वत:चाच विक्रम त्याने मोडीत काढला. तत्पूर्वी, झिम्बाब्वेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय फिंच आणि डार्सी शॉर्टने चुकीचा ठरवला.

LEAVE A REPLY

*