धोनीच्या झिवाचा व्हिडिओ व्हायरल…

0
मुंबई । आयरलँडच्या विरूद्ध खेळल्या गेलेल्या 2 सामन्यात टी 20 सिरीजमध्ये टीम इंडियाने 143 धावांच आव्हान दिलं. यासोबतच भारतने ही सिरीज 2-0 ने आपल्या नावे करून घेतली.

सामन्यानंतर ऑॅलराऊंडर हार्दिक पांड्याने धोनीची मुलगी झिवाचा एक व्हिडिओ इंस्टाग—ामवर अपलोड केला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत झिवा हार्दिक पांड्याला चिअर अप करताना दिसत आहे. कम ऑॅन हार्दिक कम ऑॅन… हार्दिकने व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे की, मला असं वाटतं की माझ्यासाठी मी नवी चीअरलेडी शोधली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आगे. 11 तासांत हा व्हिडिओ 6 लाख लोकांनी पाहिला आहे.

या व्हिडिओवर झिवाचं कौतुक केलं जात आहे. दुसर्‍या टी 20 सामन्यात पांड्याने शेवटच्या ओव्हरमध्ये धमाकेदार फलंदाजी करत फक्त 9 चेंडूत चार छक्के आणि एक चौका मारत 31 धावा करून नॉट आऊट राहिला. धोनीसोहत शिखर धवन आणि जसप्रीत बुमराहला या सामन्यात आराम मिळाला होता.

जेवढा लोकप्रिय धोनी आहे तेवढीच लोकप्रिय त्याची मुलगी झिवा देखील आहे. झिवाचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

LEAVE A REPLY

*