फ्रान्सचा धमाका: अर्जेंटिना बाहेर

0
कझान । नॉक आऊट राऊंडच्या पहिल्याच सामन्यात फ्रान्सने गत उपविजेत्या अर्जेंटिनाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. फ्रान्सने 4-3 गोल फरकाने विजय मिळवत विश्वचषक सामन्यातील अर्जेंटिनाविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी साकारली.

4-2 ने पिछाडीवर असणार्या अर्जेंटिनाने अतिरिक्त चार मिनिटांत गोल केल्याने सामन्यात प्राण आला होता. परंतु, चौथा गोल करण्यात अर्जेंटिना अपयशी ठरला. तसेच लिओनेल मेस्सीच्या चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा झाली.

दरम्यान, राऊंड आफ 16 च्या पहिल्याच हाय व्होल्टेज सामन्यात पहिलाच हाफ रोमहर्षक झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच फ्रान्सने चढाया करण्याचा पवित्रा घेतला. त्यांनी एका मगून एक चढाया करत अर्जेंटिनाच्या बचाव फळीवर दबाव आणला होता. त्यातच रोजोने फ्रान्सच्या स्ट्रायकरला डीमध्येच पाडल्याने फ्रान्सला पेनाल्टी मिळाली. त्यावर ग्रिझमनने 14 व्या मिनिटाला गोल करत आघाडी घेतली. त्यानंतर फ्रान्सने आक्रमणाची धार वाढवत चढाया सुरुच ठेवल्या.

फिफा विश्वचषक स्पर्धेत आज बाद फेरीतील पहिल्या सामन्यात फ्रान्सने अर्जेंटिनावर 4-3ने विजय मिळवला आणि उपउपांत्य फेरी गाठली. फ्रान्सकडून पहिला गोल ग्रीझमनने 13व्या मिनिटाला पेनल्टी किकच्या माध्यमातून केला. त्यांनतर डी मारियाने 41व्या मिनिटाला गोल करत सामन्यात बरोबरी साधली.

उत्तरार्धात 48व्या मिनिटाला मर्क्याडोने अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. पण पवार्डने गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर 19 वर्षीय कायलन एमबापे याने सामन्यात 4 मिनिटाच्या कालावधीत सामन्याच्या 64व्या आणि 68व्या मिनिटाला दोन गोल करत फ्रान्सला भक्कम आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या अतिरिक्त वेळेत अगयरोने गोल करून अर्जेंटिनाला पुनरागमनाची आशा दाखवली. पण सामना संपेपर्यंत 1 गोलची आघाडी फ्रान्सने कायम ठेवली आणि पुढील फेरीत प्रवेश केला.

सामन्याच्या 35 व्या मिनिटानंतर अर्जेंटिनाने आक्रमक खेळ करत चढाया सुरु केल्या. या चढायांना 41 व्या मिनिटाला यश आले डी मारियाने डाव्या पायाने एक अप्रतिम फटका मारत मैदानी गोल नोंदवला.

त्यानंतर फ्रान्सने गोल फेडण्यासाठी आक्रमण केला पण 1-1 बरोबरी मोडता आली नाही. पहिल्या सत्रात या सामन्यात 64 टक्के बॉल पजेशन असुनही त्यांना फ्रान्सवर चढाया करण्यात अपयश आले.

LEAVE A REPLY

*