कॅरोलिना मरीनवर मात करत पी.व्ही.सिंधू उपांत्य फेरीत

0
क्वालालंपूर । भारताच्या पी.व्ही. सिंधूने रिओ ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या कॅरोलिन मारीनला पराभवाचा धक्का दिला.

दमदार स्मॅश आणि नेट जवऴील परफेक्ट प्लेसिंगचा खेऴ करत सिंधूने मलेशिया ओपन वर्ल्ड टूर सूपर 750 स्पर्धेतील ही लढत 22-20, 21-19 अशी जिंकली. या विजयासह सिंधूने उपांत्य फेरीत प्रवेश केला. सिंधूसह श्रीकांत किदम्बीनेही उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पहिल्या सेटमध्ये सिंधूने 1 गुण कमावत आघाडी घेतली. मात्र कॅरोलिना मरीनने आपला आक्रमक खेळ दाखवत सिंधूला मोठी आघाडी घेण्याची संधी दिलीच नाही. मात्र सिंधूने मरीनच्या आक्रमणचा मुकाबला करत 5-3 अशी आघाडी कायम ठेवली. मध्यांतरापर्यंत सिंधूने 11-10 अशी एका गुणाची आघाडी घेतली. मध्यांतरानंतर मरीनने सामन्यात पुनरागमन करण्याचे प्रयत्न केले. काही क्षणांसाठी मरीनने सिंधूशी बरोबरीही केली. मात्र सिंधूने आपला सर्व अनुभव पणाला लावत पहिला सेट 22-20 असा खिशात घातला.

पहिल्या सेटमध्ये मरीनने दिलेली झुंज पाहता दुसरा सेट अटीतटीचा होणार हा अंदाज सर्वांनी बांधला होता. याप्रमाणे कॅरोलिनाने पहिल्या क्षणापासून आक्रमक खेळ करत सिंधूवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. मात्र सिंधूने दमदार पुनरागमन करत दुसर्‍या सेटमध्ये 5-3 अशी आघाडी घेतली. दुसर्‍या सेटच्या मध्यांतरापर्यंतही सिंधूने 11-6 अशी आघाडी कायम ठेवली होती. दुसर्‍या सेटच्या मध्यांतरानंतर मात्र सिंधूने मरीनला पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. 21-18 अशा फरकाने दुसरा सेटही जिंकत सिंधूने सामनाही आपल्या नावे केला.

सायना नेहवालच्या पराभवाने सिंधूवर भारताचे स्पर्धेतील आव्हान जिवंत राखण्याची मदार होती. मात्र, उपांत्य फेरीच्या तिच्या मार्गात स्पेनच्या मारीनचा अडथऴा होता. उपांत्यपूर्व फेरीच्या या चुरशीच्या लढतीत सिंधूने कडवी झुंज देताना मारीनवर विजय मिऴवला. या विजयासह सिंधूने रिओतील पराभवाची परतफेड केली. उपांत्य फेरीत तिला चायनिज तैपेइच्या ताय झु यिंगचा सामना करावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

*