भारत मजबूत स्थितीत

0
बेंगळुरू । अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात सलामीवीर शिखर धवनने पहिल्याच सत्रात शतकी खेळी साकारली. धवनची ही शतकी खेळी विक्रमी ठरली. याखेळीने धवनने टीम इंडियाचा धडाकेबाज माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला.

भारताचे सलामीवीर शिखर धवन, मुरली विजय यांचे शतक आणि तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या लोकेश राहुलने अर्धशतक झळकवून भारताला मजबूत सुरुवात करून दिली. मात्र, यानंतरच्या फलंदाजांना चमकदार कामगिरी करता आली नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या 6 बाद 347 अशी होती.

शिखर धवनने 96 चेंडूत 107 धावांची खेळी केली. त्यात 3 षटकार आणि 19 चौकारांचा समावेश होता. तर मुरली विजयने 153 चेंडूत 15 चौकार आणि 1 षटकारासह 105 धावांची खेळी केली. लोकेश राहुलने 64 चेंडूत 54 धावा केल्या. चेतेश्वर पुजारा 35, अजिंक्य रहाणे 10, दिनेश कार्तिक 4 धावा केल्या. दिवसाअखेरीस हार्दिक पांड्या 10 धावा तर अश्विन 7 धावा करत नाबाद खेळत आहेत.

अफगाणिस्तानच्या यामीन अहमदझईने सर्वाधिक 2, तर वफादार, राशीद खान आणि मुजीब उर रहमानला प्रत्येकी एक बळी मिळाला.

उपाहाराआधीच शतक झळकावणारा शिखर पहिला भारतीय शिखर धवनने अफगाणिस्तानविरुद्धच्या बंगळुरु कसोटीत नवा इतिहास घडवला. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी उपाहाराआधीच शतक झळकावणारा तो भारताचा पहिला आणि जगातला सहावा फलंदाज ठरला. पण दुर्दैवाची बाब म्हणजे शिखर धवन पुन्हा अल्पसंतुष्ट ठरला. धवनच्या फलंदाजीने मायबाप पब्लिकही खुश झाली. पण शिखर धवनने चिन्नास्वामी स्टेडियमवर एक महाविक्रमी खेळी उभारण्याची संधी वाया दवडली.

याआधी ऑॅस्ट्रेलियाचे माजी विकेट कीपर ट्रंपर, चार्ली मॅकार्टनी, डॉन ब—ॅडमन, डेव्हिड वॉर्नर आणि पाकिस्तानच्या माजीद खाननं हे रेकॉर्ड बनवलं होतं.ऑॅस्ट्रेलियाच्या ट्रंपर यांनी 1902 साली मॅन्चेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या टेस्टच्या पहिल्या इनिंगच्या पहिल्या सत्रात 103 रन केले होते. ऑॅस्ट्रेलियाच्याच मॅकार्टनी यांनी 1926 साली इंग्लंडविरुद्धच 112 रन केले होते. सर डॉन ब—ॅडमन यांनी 1930 साली लीड मैदानात 105 रनची शतकीय खेळी केली होती. पाकिस्तानच्या माजीद खान यांनी 1976-77 साली कराचीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 108 रन केल्या होत्या. ऑॅस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरनं 2016-17 साली सिडनीमध्ये झालेल्या टेस्ट मध्ये पाकिस्तानविरुद्ध 100 रन केले होते. यामध्ये आता शिखर धवनचं नाव जोडलं गेलं आहे.

बंगळुरु कसोटीत पहिल्या दिवशी उपाहाराला खेळ थांबला, त्यावेळी धवनने 91 चेंडूंत 19 चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 104 धावांची खेळी उभारली होती. वास्तविक शिखरने ज्याच्याकडून आक्रमक फलंदाजीचा वारसा घेतला आहे, त्या वीरेंद्र सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये एक नाही, तर दोन दोन त्रिशतके ठोकली आहेत. सेहवागचा हा आदर्शही धवनने घ्यायला हवा.

LEAVE A REPLY

*