रशियाची धमाकेदार सुरुवात; सौदीवर दागले पाच गोल

0
मॉस्को । 21 व्या विश्वचषकात रशियाने उद्घाटन सामन्यात धमाकेदार सुरुवात करत 67 व्या स्थानावर असलेल्या सौदी अरेबियाचा 5 – 0 ने दारूण पराभव केला. 80 हजार घरच्या प्रेक्षकांच्या साक्षीने रशियाने आपली विश्वचषकाची सुरुवात एका पाठोपाठ पाच गोल करत केली.

रशियाने सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत सौदीच्या गोल पोस्टवर जोरदार चढाया केल्या. त्यांच्या चढाईला 12 व्या मिनिंटला पहिले यश आले. रशियाच्या मिडफिल्डर युव्ही गॅझेन्सकीने रशियाचे गोलचे खाते खोलले. त्यानंतर 41व्या मिनिटाला दुसरा गोल करत आघाडी 2 गोलने वाढवली.

त्यानंतर सौदीने गोल फेडण्याचा प्रयत्न केला पण, त्यांना गोल करण्यात अपयश आले. सौदीचे सामन्यात चेंडूवर 62 टक्के नियंत्रण असूनही एकही गोल करता आला नाही. त्यानंतर *71 व्या मिनिटाला रशियाकडून आरतेम डॅझुकाने तिसरा गोल केला. यामुळे सौदीच्या आशा संपुष्टात आल्या.

त्यानंतरही रशियाने आक्रमक पवित्रा कायम राखत एक्स्ट्रा टाईममध्ये दोन गोल करत सौदीचे कंबरडेच मोडले. रशियाकडून डेनिस चेरिशेव्हने दोन गोल करत विजयात मोलाचे योगदान दिले.

LEAVE A REPLY

*