रंगारंग कार्यक्रमांनी फिफा विश्वचषकास प्रारंभ

0
मॉस्को । मॉस्कोतील 80 हजार आसनक्षमता असलेल्या देखण्या लुझ्निकी स्टेडियमवर दिमाखदार सोहळ्याने आज फिफा वर्ल्डकप 2018चा शुभारंभ झाला.

यंदाच्या वर्ल्डकपसाठी बनवण्यात आलेले ‘लिव्ह इट अप’ हे गाणे सगळ्यात सुरुवातीला वाजले आणि नंतर अर्धा तास रंगारंग सोहळ्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ब्रिटनचा रॉकस्टार रॉबी विल्यम्स तसेच रशियन गायिका एडा गरिफुलिना यांच्या सादरीकरणानंतर मॉडेल व्हिक्टोरिया लोपरेया ही फुटबॉल घेऊन मैदानात उतरली.

त्यानंतर ब्राझीलचा महान फुटबॉलपटू रोनाल्डोने फुटबॉलला किक मारली आणि वर्ल्डकपच्या महाकुंभाला सुरुवात झाली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फांटिनो यांनी वर्ल्डकपचे उद्घाटन झाल्याची अधिकृत घोषणा केली.

फिफा चषकासाठी 32 संघ आमनेसामने उभे ठाकणार असून विजेतेपदासाठी प्रत्येक संघ कडवा संघर्ष करताना पाहायला मिळेल.

LEAVE A REPLY

*