मेसीला पाहणे महत्त्वाचे – छेत्री

0
कोलकाता । रुसमध्ये सुरु होत असलेल्या फिफा विश्वकप मध्ये फक्त लियोनेल मेसीची जादू पाहू इच्छित आहे. परंतु मी अर्जेटिनाला विश्वकपचा दावेदार मानत नाही. असे मत भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने व्यक्त केले.

छेत्रीने फुटबॉल प्लेयर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एफपीएआय) च्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यानंतर पत्रकारांना सांगितले की, ‘जर तुम्ही मला चार चांगल्या संघाची नावे विचाराल तर मी जर्मनी, स्पेन, ब—ाझील आणि फ्राँसचे नाव घेईल जे खरेच खूप मजबूत दिसत आहेत. एखादा संघ ही याला चूकीचे ठरवू शकेल. इंग्लंड आणि बेल्जियही सध्या चांगले संघ आहेत.

मेसी आपल्या संघा बरोबर तीन अंतिम सामने हरला आहे. यामध्ये 2014 च्या विश्वकप आणि दोन कोपा अमेरिका फाइनल आहेत. छेत्रीने नुकतेच इंटरकॉटिनेंटल कपमध्ये अंतिम सामन्यात शानदार दोन गोल करुन भारताला चॅम्पियन बनविले आहे. त्याने पूर्ण स्पर्धे मध्ये आठ गोल केले आणि मेसीच्या 64 आंतरराष्ट्रीय गोलच्या विक्रमाची बरोबरी केली. छेत्रीने म्हटले की 2014 मध्ये अयशस्वी राहिल्यानंतर मेसी या वर्षी विश्व कप जिंकण्याचा हक्कदार आहे.

त्याने म्हटले की जर त्याने गोल केला तर मला आनंद होइल. मी त्याचा प्रशंसक आहे आणि मी माझी तुलना त्यांच्याशी करु इच्छित नाही आणि इतरानीही ती करु नये. मला आशा आहे की मेसी गोल करेल आणि अर्जेटिना चांगले प्रदर्शन करेल. त्याने म्हटले की मला वाटत नाही मेसी आणि रोनाल्डोचा शेवटचा विश्व कप असेल. ते खूप फिट आहेत. आंद्रेस इनिस्ता एक उपहारा सारखा आहे आणि त्याचा हा शेवटचा विश्व कप असेल यासाठी त्याने आपल्या खेळाचा आनंद घ्यावा.

LEAVE A REPLY

*