कसोटी सामन्यात बदल आवश्यक! केव्हिन पीटरसन

0
बेंगळुरु । प्रकाशझोतातील क्रिकेट खेळण्यास भारतीय संघ अद्याप राजी नसला, तरी इंग्लंडचा कर्णधार केव्हिन पीटरसनच्या मते क्रिकेटचा हा पारंपरिक प्रकार जर जपायचा असेल तर या क्रिकेटच्या बदलाला स्वीकारावे लागेल. मन्सूर अली खान पतौडी यांच्या स्मृत्यर्थ दरवर्षी आयोजित केल्या जाणार्‍या भाषणात पीटरसन याने हे विचार बोलून दाखविले.

पीटरसनच्या रूपात प्रथमच एका परदेशी क्रिकेटपटूला या भाषणासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्या निमित्ताने पीटरसनने प्रकाशझोतातील क्रिकेटची आवश्यकता आपल्या या भाषणातून व्यक्त केली. पीटरसन म्हणाला, ‘जर पाच दिवसांच्या क्रिकेटसाठी खेळाडू बांधील असावेत असे वाटत असेल, तर त्यासाठी त्यांना मानधन द्यावे

लागेल. हे पैसे कसे देता येतील? अर्थातच, कसोटीत काहीतरी नवे बदल करूनच. प्रकाशझोतातील क्रिकेटद्वारे ते शक्य आहे. मार्केटिंग करणे ही काळाची गरज आहे. जर कसोटी क्रिकेटमध्ये खरोखरच तेवढी क्षमता आहे, तर त्यासाठी त्याचे योग्य मार्केटिंग व्हायला हवे.

प्रत्येक सामन्याचे महत्त्व वाढायला हवे. मार्केटिंगच्या मिळतील तेवढ्या संधी साधायला हव्यात. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी तिकिटांचे दर कमी असले पाहिजेत. चाहत्यांना कसोटी क्रिकेटकडे वळवावे लागेल. टी-20 क्रिकेट हेच क्रिकेट आहे, या कल्पनेतून बाहेर यायला हवे असे तो म्हणाला.

LEAVE A REPLY

*