यंदा मांजर करणार फिफाची भविष्यवाणी!

0
नवी दिल्ली । रशियात 14 जुळ्या पासून सुरु होत असलेल्या फिफा वर्ल्ड कप मध्ये हा कप कोण जिंकेल? याचे अंदाज वर्तविले जाऊ लागले आहेत. अर्थात याचा निर्णय 15 जुलैला प्रत्यक्ष कळेल. बर्‍याच फुटबॉलप्रेमींनी यंदा जर्मनीला पसंती दिली आहे तर काही जणांनी फ्रांस, ब—ाझील आणि स्पेनच्या पारड्यात त्याची मते टाकली आहेत.

दुसरीकडे अर्जेन्टिनाला कमी समजू नका असाही इशारा दिला जात आहे. एकंदरीत विजयी टीम कोण असेल याची भविष्यवाणी करणे सोपे नाही.
मात्र, एक ज्योतिषी असा आहे की जो अगोदरच ही भविष्यवाणी करणार आहे. हा ज्योतिषी म्हणजे अचीलेस नावाची पांढरीशुभ— मांजरी आहे. 2010 च्या फिफा वर्ल्ड कप मध्ये पॉल नावाच्या ओक्टोपसने कोणती टीम जिंकणार याची अचूक भविष्यवाणी केली होती. त्यामुळे या मांजरीची जबाबदारी वाढली आहे.

ही माजरी सेंट पिटसबर्ग येथील हर्मिटेज संग—हालयात सध्या मुक्कामाला असून तिचे ट्रेनिंग सुरु आहे. फिफा सुरु होताच तिचे भविष्यांकन सुरु होणार आहे. अर्थात या मांजरीला भविष्य सांगण्याचा पूर्वानुभव आहे. तिने 2017 मध्ये कॉन्फेडरेशन कपचे भविष्य वर्तविले होते. ही मांजर ऐकू शकत नाही.

त्यामुळे ती अधिक एकाग—तेने काम करते असे समजते. फिफा सामने सुरु झाले की तिच्यासमोर ज्या दोन टीम मध्ये सामना होणार आहे त्या देशांचे ध्वज असलेले खाण्याचे दोन बॉल ठेवले जातील. त्यातील ज्या बॉलला ती स्पर्श करेल तो संघ जिंकेल असे समजले जाणार आहे.

LEAVE A REPLY

*