दिग्गजांना जमले नाही, ‘मिताली’ने ते करुन दाखवले

0
मुंबई । भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजने आपल्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. तिने टी-20 क्रिकेटमध्ये 2 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारी मिताली पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे एकाही पुरुष भारतीय खेळाडूला हा विक्रम साधता आलेला नाही.

मिताली सध्या मलेशियात सुरु असलेल्या महिला आशिया चषकात खेळते आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मितालीने 33 धावांची खेळी करत 2000 धावांचा टप्पा ओलांडला. पुरुष संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या खात्यावर सध्या 1982 धावा जमा आहेत. याआधी हा विक्रम कोहलीच्या नावे होता.

त्यामुळे मितालीने केलेली कामगिरी ही विशेष ठरली आहे. 2 हजार धावांचा टप्पा ओलांडणारी मिताली राज ही सातवी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. इंग्लंडची कार्लोस एडवर्ड ही 2605 धावांसह पहिल्या स्थानावर आहे. मितालीच्या आतापर्यत 74 सामन्यात 38 च्या सरासरीने 14 अर्धशतकांच्या जोरावर 2015 धावा केल्या आहेत.

LEAVE A REPLY

*