बॉक्सिंग स्पर्धेत संजना चंडालेला सुवर्णपदक

0
भुसावळ । ठाणे येथील दादाजी कोंडदेव स्टेडियम मध्ये दि.2 ते 7 जून दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या सातव्या सबज्युनियर मुलींच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत भुसावळ येथील संजना विरू चंडाले या 15 वर्षीय महिला मुष्टियोद्धा खेळाडूने 54 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले आहे.

स्पर्धेत यश मिळवून भुसावळात रेल्वे स्थानकावर पहोचताच तिचे माजी सभापती तथा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी व समर्थकांनी जोरदार स्वागत व सत्कार केला. ती भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ते विरू चंडाले यांची कन्या आहे. संजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे

LEAVE A REPLY

*