अफगाणिस्तानचा बांगलादेशाला ‘व्हाईट वॉश’

0
देहरादून । देहरादूनच्या राजीव गांधी स्टेडियमवर रंगलेल्या तिसर्‍या टी -20 सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशवर एका धावेने रोमांचक विजय साजरा केला. केवळ 145 धावांचा आकडा धाव फलकावर असताना अफगाणिस्तानने निराश न होता अखेरच्या षटकामध्ये विजय खेचून आणला.

अफगाणिस्तान संघाने बांगलादेशला या टी-20 मालिकेत 3-0 असे पराभूत करत व्हाइटवॉश दिला आहे. अखेरच्या षटकात बांगलादेशला विजयासाठी 9 धावांची गरज असताना राशीद खानने आपली कमाल दाखवत बांगलादेशला विजयापासुन दूर ठेवले. शेवटच्या चेंडूवर चार धावांची गरज असताना बांगलादेशला केवळ दोन धावा करता आल्या आणि अफगाणिस्तान सामना जिंकला.

बांगलादेशकडून सर्वाधिक धावा
मुशफिकुर रहमानने केल्या. त्याने 37 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 46 धावांची खेळी केली. तर महमदुल्लाहने 38 चेंडूंत 45 धावा केल्या. मुशफिकूर रहीमला सामनावीर तर उत्कृष्ट गोलंदाजीसाठी राशीद खानला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. सामन्यात मात खाल्यानंतर बांग्लादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने म्हटले की, अटीतटीच्या सामन्यात पराभव पत्करणे मानसिकपणे दृढतेत कमजोरीचे लक्षण आहे.

आमच्या संघाला या दिशेत काम करावे लागेल. संघ विजयाच्या जवळ होता, परंतु पुन्हा एकदा तो पराभूत झाला. असे पहिल्यांदा झाले नाही. 2016 विश्वचषकात भारताविरूद्ध खेळलेला सामना सर्वांना लक्षात आहे. तसेच आताच श्रीलंकेमध्ये खेळलेल्या निदास ट्रॉफीचे फायनलही बांग्लादेश जिंकता-जिंकता राहिला. आम्ही चांगले प्रदर्शन सुध्दा केले नसल्याची कबुली त्याने दिली हे विशेष.

LEAVE A REPLY

*