जाडेजाला फटकावण्याची इच्छा होती – रोहित शर्मा

0
नवी दिल्ली । क्रिकेटपटूंची मुलाखत घेणार्‍या विक्रम साठे यांच्याशी बोलताना रोहितने एक धक्कादायक कबुली दिली आहे. दक्षिण आफ्रिकेत असताना आपल्याला रवींद्र जाडेजाला फटकावण्याची इच्छा झाली होती, असे रोहितने मान्य केले. रोहितसोबत त्याचा मुंबईचा साथीदार अजिंक्य रहाणेही या कार्यक्रमात सहभागी झाला होता.

द. आफ्रिकेच्या दौर्‍यावर असताना एका प्रसंगाची आठवण यावेळी अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांनी करुन दिली. जंगल सफारीदरम्यान आम्हाला वाटेत 2-3 चित्ते दिसले. आम्हाला वाटले की, आम्ही त्यांच्यापाठीमागे जात आहोत. मात्र काही काळानंतर आमच्या लक्षात आले की, आम्ही जंगलाच्या पूर्ण आत शिरलो होतो आणि आजूबाजूला काय घडतेय याची आम्हाला जराशीही कल्पना नव्हती.

मी, रोहित आमच्या पत्नी व रवींद्र जडेजा एका क्षणानंतर जंगलाच्या बरोबर मध्यभागी पोहचलो आणि त्याचवेळी चित्त्यांनी थांबून आमच्या गाडीकडे मोर्चा वळवला. त्या सर्व प्रकाराला रवींद्र जाडेजा जबाबदार होता. चित्ते समोर असताना तो विचित्र आवाज काढत होता.

ते पाहून मी त्याला म्हणालो, अरे तू काय करतोय? आपण जंगलाच्या मध्यभागी उभे आहोत. जर चित्त्यांनी आपल्यावर हल्ला केला तर सगळे संपेल. यावेळी जाडेजाला फटकावण्याची इच्छा झाली होती, असेही रोहितने मान्य केले.

LEAVE A REPLY

*