विराट कोहलीला ‘स्लिप डिस्क’चा त्रास नाही!

0
मुंबई । भारताचा कर्णधार विराट कोहली याला ‘स्लिप डिस्क’च्या आजारानं ग्रासल्याच्या वृत्ताचं बीसीसीआयने खंडन केलं आहे. ‘विराटला असा कोणताही आजार नाही. त्याच्या केवळ मानेमध्ये चमक (नेक स्प्रेन) आहे,’ असं बीसीसीआयनं स्पष्ट केलंय.

विराट ‘स्लिप डिस्क’ या आजारानं त्रस्त असून डॉक्टरांनी त्याला कौंटी क्रिकेट न खेळण्याचा सल्ला दिला आहे. इंग्लंड दौर्‍यातही तो खेळण्याची शक्यता कमी आहे, असं वृत्त प्रसारित झालं होतं. स्लिप डिस्कच्या आजारासंबंधी डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी विराट काल खारमधील एका रुग्णालयात गेला होता.

तिथं त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याच्या मणक्यांभोवतीच्या पेशींना इजा झाल्याचं वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आल्याचंही बोललं जात होतं.

बीसीसीआयनं विराटच्या आजारबद्दलची ही चर्चा फेटाळली आहे. विराटच्या कौंटी क्रिकेटच्या दौर्‍यात कपात करण्यात येईल. तो केवळ दोन दिवसीय लढती खेळू शकेल. रॉयल लंडन चषक स्पर्धेतील 50 षटकांचे पाच सामने खेळू शकणार नाही, असंही बीसीसीआयच्या अधिकार्‍याने स्पष्ट केलंय.

LEAVE A REPLY

*