सेरेनाची माघार, शारापोव्हा उपांत्यपूर्व फेरीत

0
पॅरिस । अमेरिकेची अव्वल महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्सने फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. सेरेनाला दुखापत झाल्याने तिने माघार घेतली. त्यामुळे चाहत्यांना या स्पर्धेतील सेरेना विरुद्ध शारापोव्हा ही लढत पाहायला मिळाली नाही.

आई झाल्यानंतर पुनरागमन करणार्‍या सेरेनाने फ्रेंच ओपनमध्ये विजयी सुरुवात केली होती. तिने सलग 3 सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे सेरेना पुन्हा एकदा जेतेपद पटकावणार का? याची उत्सुकता चाहत्यांना होती.

त्यात तिचा चौथा सामना मारिया शारापोव्हाबरोबर होणार होता. दोन दिग्गज खेळाडूंमधील लढत पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. मात्र सामन्यापूर्वीच सेरेनाने जायबंदी असल्याचे जाहीर केले. आता सेरेना पॅरिसमध्ये असून येथेच ती वैद्यकीय चाचणी करणार आहे.

सेरेनाने माघार घेतल्यामुळे शारापोव्हा उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली. दरम्यान सामना अर्धवट सोडावा लागल्याचे दु:ख वाटत आहे. अशा पद्धतीने मला माघार घ्यावी लागेल, याचा मी विचारही केला नव्हता, अशी प्रतिक्रिया सेरेनाने दिली.

LEAVE A REPLY

*