सायना – सिंधूमध्ये नक्की काय बिनसलं?

0
हैदराबाद । ऑॅलिम्पिक पदक विजेत्या सायना नेहवाल आणि पी.व्ही.सिंधू यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरु आहे.

दोघीही पी. गोपिचंद यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबाद इथल्या अकादमीमध्ये सराव करतात. मात्र दोघीही एकत्र सराव करण्यास अनुकूल नसल्यानं दोघीही वेगवेगळ्या कोर्टवर सराव करतात. राष्ट्रकूल स्पर्धेत या दोघीही अंतिम फेरीत एकमेकींविरुद्ध उभ्या ठाकल्या होत्या. या स्पर्धेनंतर गोपीचंद दोघींनाही वेगवेगळ्या वेळी मार्गदर्शन करत आहे.

याबाबत पी. गोपीचंद यांना विचारणा केली असता हा निर्णय प्रशिक्षक विभागानं घेतल्याचं गोपीचंद यांनी सांगितलं. दोघींच्याही हितासाठी हा निर्णय घेतला असून यापूर्वीही त्यांनी वेगवेगळा सराव केला असून खेळाडूंला जे अनुकूल वाटत त्यानुसार आम्ही निर्णय घेत असल्याचं गोपीचंद यांनी स्पष्ट केलं.

सायना हिनं 2012 मध्ये लंडन ऑॅलिम्पिकमध्ये कांस्य तर 2016 रियो ऑॅलिम्पिकमध्ये सिंधूंनं रौप्य पदक पटकावलं असून दोघींमध्येही चांगलीच लढत पहायला मिळते.

LEAVE A REPLY

*