कसोटी क्रमवारीत विराट दुसर्‍या स्थानी

0
मुंबई । आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारी जाहीर केली असून आयसीसीच्या या यादीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली दूसर्‍या स्थानावर आहे. तर ऑॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथ पहिल्या स्थानावर आहे. तर तिसर्‍या स्थानावर इंग्लंडचा कर्णधार जो रूट आहे.

हेडिंग्लेमध्ये खेळल्या गेलेल्या टेस्ट मॅच मध्ये शानदार प्रदर्शन करणारा पाकिस्तानच्या विरोधात टीमला विजय मिळवून देणारा इंग्लंडचा बॉलर क्रिस वोक्स आणि स्टुअर्ड ब—ॉडला कसोटी क्रमवारीमध्ये फायदा झाला आहे. कसोटी क्रमवारीमध्ये गोलंदाजांच्या यादीत वोक्सला एका स्थानाचा फायदा झाला आहे.

आता ब—ॉड 12 व्या स्थानावर आहे तर वोक्स 34 व्या स्थानावर आहे. इंग्लंडने दूसर्‍या कसोटी सामन्यामध्ये पाकिस्तानला एक डाव आणि 55 धावांनी मात देत मालिका 1-1 ने बरोबर केली. विराट कोहलीचे लक्ष पहिल्या स्थानावर आहे हे विशेष.

LEAVE A REPLY

*