भारताचा मलेशियावर विजय

0
क्वालांलापूर । महिला टि-20 आशिया कप क्रिकेट स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात भारताने संघाची कर्णधार मिताली राजच्या शानदार 97 धावा आणि घातक गोलंदाजीच्या जोरावर रविवारी यजमान मलेशियाला 142 धावाने पराभूत केले.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत निर्धारित 20 षटकामध्ये तीन गडी बाद 169 धावांची मजबूत धावसंख्या उभारली आणि मलेशियाला 13.4 षटकामध्ये 27 धावांमध्ये बाद केले. मलेशियाई संघाचा एकही फलंदाज दुहेरी आंकडा पार करु शकला नाही तर सहा फलंदाज आपले खातेही उघडू शकले नाहीत संघासाठी शशा आजमीने सर्वाधिक 9 धावा केल्या. भारताकडून पूजा वस्त्राकारने सहा धावामध्ये तीन गडी, अनुजा पाटिल आणि पूनम यादवने प्रत्येकी दोन आणि शिखा पांडेने एक गडी बाद केला.

या आधी भारताने 20 षटकामध्ये तीन गडी बाद 169 धावांची मजबूत धावसंख्या उभारली. मितालीने 69 चेंडूत 13 चौकार आणि एक षटकार मारला. कर्णधार हरमनप्रीत कौरने 23 चेंडूवर चार चौकारच्या मदतीने 32 आणि दिप्ती शर्माने 12 चेंडूत दोन चौकारासह नाबाद 18 धावा केल्या.

या स्पर्धेमध्ये पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि थांयलँडचे संघही भाग घेत आहेत.

LEAVE A REPLY

*