भारतीय महिला हॉकी संघाचे स्पेन दौर्‍यासाठी राणीकडे नेतृत्व

0
नवी दिल्ली । स्पेन दौर्‍यासाठी राणी रामपाल हिच्याकडे पुन्हा भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. या दौर्‍यासाठी गुरुवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या दौर्‍याला 12 जूनपासून सुरुवात होईल. या दौर्‍यात भारतीय संघ पाच सामन्यांची मालिका खेळणार आहे.

जुलैमध्ये लंडन येथे हॉकी वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. त्या दृष्टीने भारतीय महिलांसाठी स्पेन दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. राणीला एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विश्रांती देण्यात आली होती. एशियन स्पर्धेत भारताला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला आणि रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या संघात गोलकीपर सविताकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले.

युवा स्वातीला दुसरी गोलकीपर म्हणून संधी देण्यात आली आहे. ‘वर्ल्डकपपूर्वी अंतिम संघ निश्चित करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. त्याचबरोबर जकार्ता येथे एशियन गेम्सही आहेत. आगामी स्पर्धांमध्ये आम्ही विविध खेळाडूंना संधी देणार आहोत. तसेच, खेळाडूंना अधिकाधिक लढती खेळण्याची संधी देणार आहोत,’ असे प्रशिक्षक जोर्द मरीन यांनी सांगितले.

भारतीय महिला संघ
राणी रामपाल (कॅप्टन), सविता, स्वाती, सुनीता लाक्रा, दीप ग्रेस एक्का, सुमन देवी, दीपिका, गुरजित कौर, सुशीला चानू, नमिता टोप्पो, लिलिमा मिन्झ, मोनिका, नेहा गोयल, नवज्योत कौर, निक्की प्रधान, वंदना कटारिया, नवनीत कौर, लालरेमसिमी, उदिता, अनुपा बार्ला.

LEAVE A REPLY

*