उसेन बोल्ट डोपिंग प्रकरणात दोषी

0

जमैका । जमैकाचा विश्वविक्रमवीर धावपटू उसेन बोल्ट डोपिंग प्रकरणात अडकल्यामुळे त्याला सुवर्ण पदक परत करावे लागले. परिणामी त्याचा एका ऑलिम्पिक स्पर्धेत सलग 9 सुवर्ण जिंकण्याचा विक्रम बाद ठरवण्यात आला आहे.

बिजिंग ऑलिम्पिकमध्ये बोल्टचा सहकारी नेस्टा कार्टर उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. या निर्णयाविरोधात त्याने याचिका दाखल केली होती. परंतु पुन्हा एकदा नेस्टाला दोषी ठरवण्यात आले आहे. नेस्टा कार्टर ऑलिम्पिकमधील रिले शर्यत प्रकारात दोषी आढळला होता. हा खेळ प्रकार सांघिक असल्यामुळे या प्रकरणात उसेन बोल्टलाही दोषी ठरवण्यात आले आहे.

परिणामी बोल्टचेही सुवर्णपदक परत घेण्यात आले. बिजिंग ऑलिम्पिकमध्ये बोल्टने 9 सुवर्णपदके जिंकली होती. परंतु या डोपिंग प्रकरणामुळे त्याचे एक सुवर्ण परत घेण्यात आले आहे. या 400 मीटर रिले शर्यतीची सुरवात नेस्टा कार्टरने केली होती. आणि उसेन बोल्टने 37.10 सेकंदात शर्यत पुर्ण करुन सुवर्णपदक पटकावले होते.

जमैकाकडून परत घेण्यात आलेले सुवर्ण पदक आता त्रिनिदाद टोबॅगो संघाला मिळणार आहे. तसेच जपानला रजत आणि ब्राझिलला कांस्य पदक मिळणार आहे. उसेन बोल्ट हा महान ऑलिम्पिक खेळाडूंपैकी एक म्हणुन ओळखला जातो. परंतु या डोपिंग प्रकरणामुळे त्याच्या कारकिर्दीवर हा न पुसला जाणारा डाग लागला आहे.

LEAVE A REPLY

*