धोनी चाहत्यांमध्ये विराटपेक्षा आघाडीवर

0
मुंबई । आयपीएलबाबतचे काही सर्व्हेंनुसार कोणते खेळाडू चाहत्यांच्या पसंतीला उतरले आहे, हे समजत आहे. इंडियन स्पोर्ट्स फॅन यांनी आयपीएलबाबत सर्व्हे केला. या सर्वेमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे.

सर्व्हेमध्ये दहा शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्वेमध्ये तीन महत्त्वाचे प्रश्न विचारले होते. यामध्ये सर्वोत्तम खेळाडू, सर्वोत्कृष्ठ स्टेडियम आणि सर्वोत्तम ट्विटर हँडल या तीन प्रश्नांचा समावेश होता. सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीध्ये धोनीने तब्बल 27.2 टक्के मते मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे.

या यादीत धोनीने कोहलीला मागे टाकले आहे. कोहलीने या यादीत 22 टक्के मते मिळवली आहेत. या मतांनुसार कोहलीपेक्षा धोनी हा चाहत्यांच्या अधिक पसंतीस उतरत आहे. या यादीत केन विल्यम्सनने 20 टक्के मते मिळवत तिसरे स्थान पटकावले आहे.

सर्वोत्कृष्ठ स्टेडियम या विभागात बाजी मारली आहे ती मुंबईच्या वानखेडेने. कारण वानखेडेने यावेळी 30 टक्के मते मिळवली असून ईडन गार्डन्सला 20.22 मतांवर समाधान मानावे लागले आहे. सर्वोत्तम ट्विटर हँडल या विभागात वीरेंद्र सेहवागने तब्बल 56 टक्के मते मिळवली आहेत. या यादीत दुसरा क्रमांक कोहलीने पटकावला असून त्याला फक्त 11 टक्के मते मिळाली आहेत.

LEAVE A REPLY

*