राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत बोहरा स्कूल प्रथम

0
जळगाव । पॅन्थर स्पोर्टस् अकॅडमी जळगावतर्फे येथील एस.एन.डी.टी महाविद्यालयात राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत राज्यभरातून 400 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेत पारोळ्यातील बोहरा शाळेने सर्वात जास्त खेळाडू सहभागी करुन प्रथम क्रमांक पटकाविला.

स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजुमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले होते.यावेळी एन.सी.सी.चे ए.ओ.के. अ‍ॅलेक्स, पॅन्थर स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद बर्‍हाटे, माजी महापौर विष्णू भंगाळे, हर्षल चौधरी, मुंबईचे कराटे प्रशिक्षक सुधाकर भोई, शिवराज पाटील आदी उपस्थित होते.

स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून पोलीस दलाचे कराटे प्रशिक्षक विनोद अहिरे यांनी काम पाहिले. तर टाईम किपर म्हणून डिगंबर महाजन, प्रविण राव, महेंद्र जाधव यांनी काम पाहिले. तसेच प्रसंगी मुलींना आत्मसंरक्षणा बद्दल मुख्य पंच विनोद अहिरे यांची टिप्स दिल्या.त्यानंतर स्पर्धेचे बक्षिस वितरण सोहळा सायंकाळी 5 वाजता संपन्न झाले.यावेळी महापौर सिमा भोळे यांचे हस्ते सर्व विजेत्या खेळाडूंना प्रत्येक गटात सुवर्ण, रजत व कास्य पदक बक्षिस देण्यात आले. बक्षिस वितरण प्रसंगी सुभेदार अनिल कुमार, नरेश बागडे, दलबिर सिंग, प्रशांत बोंड विनोद अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुलींमध्ये बेस्ट फायटर प्रज्ञा बोदडे तर मुलांमध्ये संघपाल वाघ हे खेळाडू बेस्ट फायटर ठरले. स्पर्धेत पारोळ्यातील बोहरा शाळेने सर्वात जास्त खेळाडू सहभागी करुन प्रथम क्रमांक पटकाविला.

LEAVE A REPLY

*