जागतिक मॅरेथॉन स्पर्धेत संजय मोती यांचे यश

0
जळगाव । वि.प्र. – जीपीएस प्रणालीचा वापर करून घेण्यात आलेल्या जागतिक ऑनलाईन मॅरेथॉन स्पर्धेत जिल्हा अ‍ॅथलेटीक्स असोसिएशनचे खेळाडू संजय मानसिंग मोती यांनी 2166 कि.मी. अंतर 100 दिवसात पुर्ण करून जागतिक क्रमवारीत 62 वा क्रमांक प्राप्त केला.

या स्पर्धेत 10,567 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.श्री.मोती हे दररोज 21 कि.मी. अंतर धावत होते.त्यांच्या सोबत मनोज शिंगाणे याने 2000 कि.मी. पार करून 101 क्रमांक तर 14 वयोगटाचा रूपेश प्रमोद धावसे याने 1090 कि.मी. अंतर पार करीत जागतिक क्रमवारीत 3917 क्रमांक प्राप्त केला.

त्यांच्या यशाबद्दल प्रा.डॉ.नारायण खडके, राजेश जाधव, डॉ. पी.आर. चौधरी, डॉ. विजय पाटील, प्रा. एम.वाय.चव्हाण, अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर, डॉ. दिनेश पाटील, किरण जावळे यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

*