मुकेशभाई पटेल स्कूलचा फूटबॉल संघ विभागीयस्तरावर

0
शिरपूर । एस.व्ही.के.एम. संस्था मुंबई संचलित, तालुक्यातील तांडे येथील मुकेशभाई आर. पटेल सी.बी.एस.ई. स्कूलच्या फुटबॉल खेळाडूंच्या संघाने धुळे येथे जिल्हास्तरावर सलग चार सामने जिंकून विभागीय स्पर्धेसाठी मजल मारली.

धुळे येथे जिल्हा क्रीडा संकुलात 6 ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्यांमध्ये मुकेशभाई आर. पटेल सी.बी.एस.ई. स्कूलच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरीच्या जोरावर जिल्हास्तरावरील सलग चार सामने जिंकले. यात त्यांनी जिल्हास्तरीय 17 वर्षे वयोगटाच्या फुटबाल सामन्यात चोपडा जीन आश्रम शाळा, सैनिक शाळा मोराणे, हस्ती पब्लिक स्कूल दोंडाईचा आणि आर.सी. पटेल मेन बिल्डींग,

शिरपूर या संघांना हरवून नाशिक येथे होणार्‍या विभागीय सामन्यासाठी पात्र ठरला. या यशाबद्दल एस.व्ही.के.एम. संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आ.अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, सह-अध्यक्ष भुपेशभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, नगरसेवक तपनभाई पटेल, मुख्याध्यापिका पूनम ठाकूर आदींंनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक डी.बी.माळी, सोहेल शेख यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

*