आशियाई स्पर्धेत भालाफेटपटू निरज चोप्रा ध्वजवाहक

0
नवी दिल्ली। एशियन गेम्सच्या स्पर्धेला आता काहीच दिवसाचा अवधी राहिला आहे. 18 ऑगस्टला इंडोनेशियातील जकार्ता येथे या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. स्पर्धेतील उद्घाटन सोहळ्यात भारताच्या ध्वजवाहनाचा मान स्टार भाला फेकपटू नीरज चोप्राला मिळाला आहे. भारतीय ऑलम्पिक संघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी आज, शुक्रवारी यांची घोषणा केली.

एशियान स्पर्धेला 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत जकार्ता आणि पालेमबांग येथे ही स्पर्धा होणार आहे. 20 वर्षीय नीरज एशियन चॅम्पियन आहे, तर 20 वर्षाखालील विश्चचषक स्पर्धेत त्याने विक्रमासह सुवर्णपदक मिळवले आहे. मागील आशियाई स्पर्धेत हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंह याला ध्वजवाहकाचा मान मिळाला होता. उद्घाटन सोहळ्यात निरज भारताच्या 572 खेळाडूंचे नेतृत्व करणार आहे.

नीरज चोप्राने 2016 मध्ये आईएएफ विश्व अंडर 20 चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते. 2014 च्या आशियाई स्पर्धेत भारताचे माजी हॉकी कर्णधार सरदार सिंह ध्वजवाहक होते. कोरियाच्या इंचियोनमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने 11 सुवर्ण, 10 रौप्य आणि 36 कांस्य पदकासह एकूण 57 पदकांची कमाई केली होती. तर भारताने दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये एकूण 101 पदकांची कमाई केली होती. तर 2002मध्ये मँचेस्टर येथील स्पर्धेमध्ये 69 पदके मिळवली होती.

LEAVE A REPLY

*