जागतिक क्रमवारीत पी.व्ही. सिंधू तिसर्‍यास्थानी

0
नवी दिल्ली। लंडन ऑलम्पिकमध्ये कांस्यपदक विजेती आणि भारताची महिला बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालची जागतिक बॅडमिंटन संघाच्या(इथऋ) रँकींग मध्ये घसरण झाली आहे. ती पहिल्या दहामधून बाहेर फेकली गेली आहे. तर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सलग दुसर्‍यांदा पोहचल्यानंतरही पराभव पत्करावा लागलेल्या पीव्ही सिंधूचे तिसरे स्थान कायम राहीले आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या इऋथ रॅकिंगनुसार सायना नेहवाल 11व्या स्थानावर पोहचली आहे. गेल्या काही स्पर्धांमध्ये तिची कामगिरी खराब राहल्याने सायनाची रँकिंगमध्ये घसरण झाली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सलग आठवेळा उपांत्यपूर्व फेरीत धडक मारल्यानंतरही सायनाला स्पर्धेत पुढे मजल मारता आली नाही. याचाच फटका तिला जागतिक क्रमवारीत बसला आहे.

पीव्ही सिंधूला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम सामन्यात फ्रान्सच्या कॅरोलिना मारिनने पराभूत केले. तरीही सिंधूची कामगिरी उंचावल्याने तिने जागतिक क्रमवारीतील आपले तिसरे स्थान कायम राखले आहे. जागतिक क्रमवारीत आता सिंधूच्या पुढे एक नंबरवर तैवानची ताई जु यिंग तर दुसर्‍या नंबरवर जपानची अकाने यामागुची आहे.

बॅडमिंटनच्या जागतिक रँकिंगमध्ये पुरुषांमध्ये भारताच्या किदांबी श्रीकांतला धक्का बसला आहे. तो सहाव्या स्थानावरुन आठव्या स्थानावर घसरला आहे. तर एच.एस. प्रणॉय 11व्या स्थानावर आहे.

LEAVE A REPLY

*